मुंबई : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र काम करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावरून मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार?
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून, आता तेवढं MIM बरोबर युती करून हिंदुत्वाला कायमची तिलांजली देवून टाका… आणि स्वतःला नवाब सेना पक्षप्रमुख हे ब्रीद वाक्य कायमचं लावून घ्या..असं ट्विट मनसेचे नेते गजानन काळे यांनी करत शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला आहे.
छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचे मानले आभार
राष्ट्रवादीची ‘बी’ टीम ब्रिगेड बरोबर राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम नवाब सेनेची युती.. नवाब प्रमुखांच ब्रिगेडी (बेगडी) हिंदुत्व.. बढिया हैं..असं ट्विट करत मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेसोबत राष्ट्रवादीलाही टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बीडीडी चाळीसंदर्भात एक मोठी घोषणा
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युती बाबत, लढवय्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती तसेच, संंविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्याकडे काही नसता सोबत आलात त्यामुळे त्यांचं कौतुक करतो. शिवप्रेमी असल्याने रक्त एकच आहे. दुहीच्या शापाला गाढून टाकू. एकत्र येत नवा इतिहास घडवू. निवडणुक डोळ्यासमोर ठेवून युती नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Read also
- “नितेश राणे रात्री पत्र लिहतात काय?”; किशोरी पेडणेकरांचा राणेंना टोला
- “फुसक्या बारला युवराज वगैरे म्हणू नका”
- “शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार”; उद्धव ठाकरेंची मोेठी घोषणा
- “मला घरी जायचं आहे..माझे प्रश्न लवकर घ्या”; केसरकरांच्या विनंतीने सभागह आवाक
- गुलाम नबी काँग्रेसमधून ‘आझाद’; सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा