मुंबई : युवराजांची दिशा चुकली, पर्यावरण खातं त्यांनी घरात राहून सांभाळलं, अशी घोषणाबाजी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी करत आदित्य ठाकरे यांना डिवचले होते. या पार्श्वभूमीवर त्या फुसक्या बारला युवराज वगैरे म्हणू नका, असा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बीडीडी चाळीसंदर्भात एक मोठी घोषणा
त्या आदित्यची लाज काढली ते बरं झालं पण त्या शेंबड्याला घोड्या ऐवजी गाढवावर बसवायला पाहिजे होतं आणि त्या फुसक्या बारला युवराज वगैरे म्हणू नका, असं ट्विट करत भाजपचे नेते निलेश राणेंनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा सधला आहे.
“मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का?”
2014 ला 151 चा हट्ट धरून युती बुडवली, 2019 ला खुर्चीसाठी हिदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली..पर्यटन खाते घेऊन घरातच बसुन केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर..पुन्हा निवडणूक लढवायचे देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन..खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार..जनता हे खोटे अश्रू पुसणार नाही, तुमचा या खोट्या रडगाण्यावर भुलणार नाही..,असा मजकुर असलेला पोस्टर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून दाखवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी मुुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
गद्दार सरकारमध्ये एका मंत्रिपदासाठी किती काय काय करावे लागत आहे हे आज महाराष्ट्राने पाहिलं आहे. गेलेल्या आमदारांची मला कीव येत आहे. गेलेल्या आमदारांना मंत्रिपदे नाहीत त्यांना गळ्यात घालुन पायऱ्यांवर उभं राहावं लागत आहे. आम्हाला शिव्या द्या म्हणजे तुम्हाला मंत्रिपदं मिळतील असं या सरकारचं चालु आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे.
Read also
- “शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार”; उद्धव ठाकरेंची मोेठी घोषणा
- “मला घरी जायचं आहे..माझे प्रश्न लवकर घ्या”; केसरकरांच्या विनंतीने सभागह आवाक
- गुलाम नबी काँग्रेसमधून ‘आझाद’; सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा
- देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार?
- छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचे मानले आभार