मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही इकडे या..या बाजूला. तुम्हाला मुख्यमंत्री करायला काही अडचण येणार नाही. तुमच्यातील गुण पाहता आमच्यातील कोणीही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यास विरोध करणार नाही, असा टोला जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला होता. यावर जयवंतराव मला तुम्ही म्हणाला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेते तरी होता आलं का? असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे.
‘युवराजांची दिशा चुकली’; सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
तुम्ही मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण अगोदर अजित दादांना विचारलं का? कारण दादांची दादागिरी नेहमी चालते..ती चालायला देखील हवी, कारण ते आमचे मित्र आहेत..पण जयंतराव तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का? तुम्हाला विरोधी पक्षनेते होता आलं नाही याचं दु:ख तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“त्यामुळेच आपली मान शरमेने खाली जाते”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
भाजपने तुम्हाला मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री केलंय, एकनाथराव तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमच्या कोणताही दगड न ठेवता मुख्यमंत्री करतो, अशी ऑफरच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. त्यांच्या या भाषणाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.
औरंगाबादमध्ये काँग्रेस, राष्ट्रावादीच्या नगरसेवकांना जुगार खेळताना अटक
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणत एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली होती. त्यांच्या टाकेला मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्याबद्दल अपशब्द वापरला म्हणुन केंद्रीय मंत्र्यांना जेल मध्ये टाकलं, जेवणही करू दिलं नाही. पण मला त्यांना सांगायचंय आम्ही घटनेच्या विरोधात कोणतंही कृत्य केलेलं नाही. होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्राचा विकासाचं, राज्य समृद्ध करण्याचं, गरीब जनतेचे अश्रू पुसण्याचं, लोकांमध्ये मिसळुन त्यांचं दु:ख दूर करण्याचं, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं आणि बहुजनांच्या विकासाचं मी कंत्राट घेतलं आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Read also
- मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी मुुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
- आपचे 40 आमदार बैठकीला गैरहजर; महाराष्ट्रानंतर दिल्लीतही भाजपचे ऑपरेशन लोटस
- आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ; जयंत पाटलांची सारवासारव
- “महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचा आहे का?”; आमदारांच्या धक्काबुक्कीचा राज ठाकरेंकडून निषेध
- “गद्दार सरकारमध्ये मंत्रिपदासाठी काय काय करावे लागते”; आदित्य ठाकरेंचा पलटवार