औरंगाबाद : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अट्टल जुगाऱ्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक देखील या जुगार अड्ड्यावर जुगार खेळत असल्याचे पोलिसांंना दिसुन आले. नगरसेवक जुगार खेळताना पोलिसांना सापडल्याने औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे.
“घरातून बाहेर न पडणारे कसे निवडणुक जिंकणार?”; प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं
औरंगाबादच्या पोलिस आयुक्तालयाच्या बाजूला एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचा उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा जुगार अड्डा एका नगरसेवकाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या जुगार अड्ड्यावर पन्नास पेक्षा जास्त लोक खेळत असल्याचं उघड झाले आहे.
“सरळसेवा भरतीत 2 लाख 193 पदे रिक्त”; शंभुराजे देसाई म्हणाले, “सर्व भरती होणार”
जुगार खेळणाऱ्यामध्ये राष्ट्रावादीचा एक नगरसेवक आणि काँग्रेसचा एक नगरसेवकांचा समावेश आहे. यातीलच एक नगरसेवक हा जुगार अड्डा चालवत होता. नगरसेवक जुगार खेळत असल्याने राजकीय वरदहस्तानेच हा जुगार अड्डा सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. औरंगाबाद शहरात या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
“जे जे हॉस्पिटलमध्ये कुत्रे बसून होते, प्रशासन काय करतंय”; अन् अजित पवार चांगलेच संतापले
जुगार अड्ड्यावरून 50 लोकांना ताब्यात घेत 2 लाख 210 रूपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. सोशल रमीच्या नावावर तीरट नावाचा जुगार या अड्ड्यावर खेळला जात होता. त्यामुळे अफसर खान यांच्यासह 57 जनावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read also
- “GST च्या रूपात केंद्र सरकारचा माणुस घरात जेवतोय असं आता लोकांना वाटतंय”; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- सत्ताधाऱ्यांना निवडणुकीची भिती; आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर
- “अमोल मिटकरी महाराष्ट्राच्या राजकारणातला काळा डाग, त्यांनी आम्हाला गाजर दाखवले”
- माझ्याघरी सहा महिन्यापासुन मीटर नाही; आमदारांनी विधानसभेत मांडली व्यथा, फडणवीसांचं उत्तर
- विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मोठा राडा; मिटकरींनी सांगितला सगळा घटनाक्रम