नागपूर : मंत्रालयाच्याबाहेर काल सुभाष भानुदास देशमुख या शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. आज सकाळी विरोधी पक्षनेते अजित पावार यांनी जे जे हॉस्पिटलमध्ये त्या शेतकऱ्याला भेटायला गेले हेते, तेव्हा तेथे कुत्रे बसून होते, असं विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात म्हणाले.
एका व्यक्तीने जाळून घेतले, तर दुसरा थेट मंत्रालयावर आत्महत्येसाठी चढला; विधानसभेत खडाजंगी
हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक होते, पोलीस होते. पण व्यवस्था कुठेच काही दिसत नाही. रूग्णांच्या नातेवाईक उभे राहण्यासाठी जागा शोधत होते. त्यांना हॉस्पिटलच्या परिसरात बसायला देखील जागा दिसत नव्हती. अशा हॉस्पिटलमध्ये प्रशासन काय करत आहे, असा प्रश्न अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला आहे.
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील 18 मंत्र्यांना बंगले जाहीर; पाहा संपुर्ण यादी
संबंधित शेतकरी सुभाष देशमुख 40 टक्के भाजले आहेत. त्यांच्या प्रकृतीत अजुनही म्हणावा तसा सुधार झालेला नाही. त्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांना तैनात करावे असं अजित पवार म्हणाले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये तेथील आमदार सल्लागार समितीवर किंवा इतर कुठल्याही समितीमध्ये असतात. तेथील व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर रूग्णांना उपचार मिळणे जेवढे गरजेचे आहे. तेवढेच त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबियांनाही सुविधा मिळाल्या पाहिजेत, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
सभागृहात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना आवाहन करीत असतात, आपण या मराठी मातीचे मालक आहेत, जगाकडे पाठ फिरवू नका, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, असं सांगत आसताना विधानभवनाच्या परिसरात एक शेतकरी आत्महत्येसाठी टोकाचं पाऊल उचलतो. ही घटना महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी सरकारने निश्चित धोरण आखले पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
Read also
- “अंबादास दानवे बारामतीचा पोपट, राष्ट्रवादीची तळी उचलुन स्वत:चा पक्ष संपवला”; मनसेचा हल्लाबोल
- “शिंदे गटातील आमदारांकडून आई-बहिणींवरून शिवीगाळ”; मिटकरींचा गंभीर आरोप
- “आम्ही दिलेल्या घोषणा शिंदे गटाला झोंबल्या”; अजित पवारांचं सत्ताधारी आमदारांना टोमणा
- “इडी सरकारने राज्यातील सत्ता ओरबडून घेतलीय, जनता माफ करणार नाही”; सुप्रिया सुळे
- चुकून पाय लागला तर वाकून नमस्कार करू, परंतु जर..; शिंदे गटाचे आमदार आक्रमक