मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यावर आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बांजूच्या नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायऱ्यावर मोठा राडा बघायला मिळाला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विरोधक बंडखोर आमदारांवर तुटून पडत जोरदार घोषणाबाजी करत आहेत. . बीएमसीचे खोके मातोश्री ओके, अशा घोषणाबाजी देत शिंदे- फडणवीस गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी दिली. तसेच लवासाचे खोके बारामती ओके अशा घोषणा देऊन त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला.
“सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”
आम्ही काही केलं नाही, ते आमच्या माथ्यावर केविलवाणा प्रकार दोन ते तीन दिवसापासून आघाडीतील नेते विधिमंडळाच्या पायऱ्यावर करीत आहेत. त्यामुळे जी काही वस्तुस्थिती आहे. ती समोर आणण्यासाठी आम्ही बॅनरबाजी केली. तसेच ते मागील दिवसापासून काही करीत होते, त्यावेळी आम्ही आलो नव्हतो, परंतु विचार करा, आम्ही जर 165, 170 आलो असतो तर काय झालं असतं? असा सवाल शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
“दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, आता हे मंगळागौरीला पण देतील”; राज ठाकरेंचा शिदेंना टोमणा
कोरोना घोटाळा, सिंचन घोटाळा, तसेच इतर सगळा इतिहास ज्यावेळी आम्ही बाहेर काढला. त्यावेळी त्यांना हे चांगलाचं झोंबलं. अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, फेक समित्या अशा सगळ्याच गोष्टी बाहेर काढल्या. त्यावेळी आमचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळेच आम्ही त्यांना जशाच तसं उत्तर दिलं आहे. तसेच आम्ही कुणाला पाय लावणार नाही. चुकून पाय लागला तर वाकून नमस्कार करू, परंतु आम्हाला कुणी पाय लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही सोडणार नाही. जो येईल अंगावर त्याला घेऊ शिंगावर असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. रोज खोके खोके नाचवताहेत एकदा त्यांना बोक्के देऊन टाकू असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- एका व्यक्तीने जाळून घेतले, तर दुसरा थेट मंत्रालयावर आत्महत्येसाठी चढला; विधानसभेत खडाजंगी
- एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील 18 मंत्र्यांना बंगले जाहीर; पाहा संपुर्ण यादी
- “शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या, त्यामुळेच शिंदे गटात”; सेनेचा माजी आमदार शिंदे गटात
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
- “शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?
- “आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”