मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदेशानुसार पुणे शहरातील सात विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी सात उपशहरप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पुणे शहर सहसंपर्कप्रमुख अजय भोसले आणि शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. उद्धव ठाकरे यांना एकावर एक धक्के बसत असताना माजी आमदार अशोक पाटली यांनी देखील शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
“निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
माजी आमदार अशोक पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारत आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. हे समर्थन देताना त्यांनी शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत माझा अपमान सुरू होता. मला प्रत्येक कार्यक्रमातून डावलण्यात येत होते. मी शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात होत्या. पण यापूर्वीही मला उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर ठेवण्यात येत होतं. मी उद्धव ठाकरे यांना काही तरी सांगेल या भीतीने मला दूर ठाकरें जवळ जाऊ दिले नाही. त्यामुळे मी नाईलाजाने शिंदे गटाला समर्थन देत आहे. मी घेतलेला हा ठाम निर्णय आहे. आता मागे पुढे राहायचं नाही, असं अशोक पाटील यांनी शिंदे गटाला समर्थन देताना म्हटलं आहे.
“फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला. भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी युती करत सरकार स्थापन केले. मात्र शिवसेनेने शिंदे गटाविरोधात सर्वोच्च्य न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या. शिवसेनेने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या याचिका आज 5 न्यायाधीश्यांच्या घठनापिठाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर होणारी सुनावणी 25 ऑगस्टला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक ट्विट पण केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मुंबईतील भांडुप विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक पाटील व त्यांची पत्नी आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका .मीनाक्षी अशोक पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भेट घेऊन युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला.
Read also
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
- “शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?
- “आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
- “सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”
- “इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं