अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि अचलपूरचे आमदार रवी राणा यांच्या स्वाभिमान पार्टीच्या वतीने अमरावतीमध्ये दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी खासदार नवनीत राणा आणि अभिनेता गोविंदाने “चलो इश्क लडाए सनम” या गाण्यावर ताल धारला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. तर या व्हिडीओवरून सत्ता नसताना हनुमान चालिसा तर सत्ता येताच चलो इश्क लढाए सनम असा टोला विरोधी पक्षाने खासदार राणा यांना लगावला आहे.
“त्यामुळेच आज देव सुरक्षित नाहीत; आंबादास दानवेंचं सरकारला आवाहान
अमरावतीमध्ये दहीहंडी स्पर्धेचे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनिल बोंडे, खासदार रामदास तडस हे मान्यवर उपस्थित होते. तरूणांच्या मागणीला प्रतिसाद देत गोविंदांने “चलो इश्क लडाए सनम” या गाण्यावर ठेका धरला. गोविंदा सोबत खासदार नवनीत राणा यांनाही नाचण्यासाठी तरूणांनी मागणी केली व त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी देखील ताल धरला. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा व अभिनेता गोविंदा यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे.
“केंद्र सरकारने जीएसटी आता राशनवर देखील लावला” धनंजय मुंडेंचा केंद्रावर हल्लाबोल
नवनीत राणा यांचा डान्स पाहुन गोविंदाने त्यांचे कौैतुक करत राणा यांना मिठी मारली. त्यानंतर सोनी दे नखरे लगदे, नीचे फुलो की दुकान उपर गोरी का मकान या सारख्या लोकप्रिय गाण्यांवर त्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या व शिट्या वाजवत गोविंदा यांना प्रतिसाद दिला. नवनीत राणा यांनी काही वर्षापूर्वी चित्रपटात काम केले आहे. याचबरोबर होळी सरखे सण असो किंवा आदिवासी बांधावांच्या उत्सवांनिमित्त त्यांच्या भेटीगाठी असो, नवनीत राणा अनेक वेळा ठेका धरताना पाहायला मिळतात.
महाविकास आघाडीचे सरकार असताना हनुमान चालिसा पठण करतात मात्र भाजपचे सरकार येताच “चलो इश्क लढाए सनम” या गाण्यावर ठेका धरतात, असा टोला विरोधी पक्षाकडून नवनीत राणा यांना लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना खासदार राणा दाम्पत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास स्थान असणाऱ्या मातोश्री या निवास स्थानी हनुमान चालिसा पठण करणाऱ्या सत्तेत येताच गाण्यावर ठेका धरतात अशी टीका विरोधी पक्षाकडून होत आहे.
Read also
- “इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- “फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे
- हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड
- “राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणुन पाहा”; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना