मुंबई : मागील दोन महिन्यापासुन विश्रांतीवर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता चांगलेच सक्रिय झाले आहेत. राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणुन पहा, अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. आज राज ठाकरे यांनी नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
“डासांचे वर्गीकरणात किती नर अन् किती मादी डास आढळले?”; भुजबळांनी आरोग्य मंत्र्यांची घेतली फिरकी
लोक सध्या सुरू असलेल्या राजकारणाला वैतागले आहेत. त्यामुळे ही अस्थिरता एक संधी आहे. अशा अर्थाने पहा. लोक आपला विचार करत आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सदस्यता नोंदणीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जा, पक्ष संघटना वाढवा, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
“700 वर्षापुर्वीच्या राम, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मुर्त्या चोरीला”; विधानसभेत चर्चा
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे लवकरच सदस्य नोंदणी सुरू करणार आहे. 25 ऑगस्टपासून राज्यभरात मनसे नोंदणी सुरू केली जाणार आहे. या माध्यमातुन प्रत्येक ठिकाणच्या लोकांपर्यंत पोहचण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
“मोहित कंबोजने नाक घासावं अन् मेदु शिल्लक असेल तर आपल्या भागाचा विकास करावा”
मनसे येणाऱ्या निवडणुका भाजप सोबत युती करत लढणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीत मनसे भाजप सोबत लढणार की स्वबळावर लढणार याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या राजकीय स्थितूबाबत कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Read also
- “त्यामुळेच आज देव सुरक्षित नाहीत; आंबादास दानवेंचं सरकारला आवाहान
- “केंद्र सरकारने जीएसटी आता राशनवर देखील लावला” धनंजय मुंडेंचा केंद्रावर हल्लाबोल
- “शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला कुठेही धक्का लागलेला नाही;” न्यायालयाच्या त्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
- ” सत्तेच्या बाहेर भाजपवाले माश्यासारखे, जाधव काव-काव काय करताय”; शंभुराजे देसाई अन् भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी
- “यामुळे मनी, मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल