मुंबई : आज विधानपरिषदमध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि मंत्री शंभुराजे देसाई यांच्यात खंडाजंगी पाहायला मिळाली. सत्तेच्या बाहेर भाजपवाले माश्यासारखे तरपडत होेते, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला. त्यांनंतर जाधव काव-काव काय करताय असं प्रत्युत्तर शंभुराजे देसाई यांनी भास्कर जाधव दिले. यानंतर भास्कर जाधव आणि शंभुराजे यांच्यात चांगलीच खंडाजंगी पाहायला मिळाली. यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
“विनायक मेटेंना तात्काळ उपचार का मिळाला नाही”; फडणवीसांनी सांगितलं खरं कारण
एकनाथ शिंदे नाव फक्त शिवसेना घेताय मात्र निर्णय, कार्यक्रम सगळे भाजपचे राबवताय. गेल्या एक दीड महिन्यात असा एक निर्णय दाखवा जो तुम्ही स्वत:च्या मनाने घेतलेला आहे. तुम्ही घेतलेले सर्व निर्णय तुमच्याकडून भाजप बदलुन घेत आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. सत्तेच्या बाहेर भाजपवाले माश्यासारखे तरपडत होेते, असा टोला देखील भास्कर जाधव यांनी लगावला.
“शिंदे गट फिंदे गट काही नाही, आम्हीच खरी शिवसेना”; संतोष बंगार यांचा शिवसेनेवर दावा
शंभुराजे किमान स्वत:च्या मनाला विचारा आणि प्रत्येक गोष्टीत तोंड घालून स्वत:च अपमान करू नका. यानंतर जाधव काय-काय करू नका असं शंभुराजे म्हणाले. त्यानंतर काव-काव म्हणजे काय असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. आता पितृपक्षी येणार आहे त्याचा सराव करताय काय? असं वाटलं. निर्लज्यपणाचा कळस आहे, अशी टिका भास्कर जाधव यांनी केली. यानंतर जयंत पाटील यांनी अध्यक्ष महोद्ययांना खाली बसुन बोलणाऱ्यांवर कारवाई करणार आहे का नाही असा सवाल अध्यक्षांना केला.
फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी अन् कबुली
यासोबतच, पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… अशी घोषणाबाजी राज्य सरकारविरोधात अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीतील आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर केली. ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, पन्नास खोके, माजलेत बोके, पन्नास खोके, एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, गद्दारांचं सरकार हाय हाय, अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचं पाहयला मिळालं.
Read also
- “यामुळे मनी, मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल
- “डासांचे वर्गीकरणात किती नर अन् किती मादी डास आढळले?”; भुजबळांनी आरोग्य मंत्र्यांची घेतली फिरकी
- “700 वर्षापुर्वीच्या राम, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मुर्त्या चोरीला”; विधानसभेत चर्चा
- “मोहित कंबोजने नाक घासावं अन् मेदु शिल्लक असेल तर आपल्या भागाचा विकास करावा”
- मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर आता रोहित पवार; ट्विट करत दिली माहिती