जळगाव : आदित्य ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्रभर झंझावती दौरे सुरू आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन आदित्य ठाकरे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जाहीरपणे टिका करीत आहेत. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते असलेल्य़ा गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातून गद्दारांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत या गद्दारांना धडा शिकवा असं आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी जनतेला केलं. यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“देशातील काही महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न”; छगन भुजबळ
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला . त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्रनी आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले , मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे .
“सत्ता तुमची पण आमदार मीच, आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढू”; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सज्जड दम
भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार , या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आणला . महाराष्ट्रातील जनता याना मतपेटीतून याचे उत्तर देईलच असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला .
“श्वेता महालेंच्या कार्यक्रमात तुफान हाणामारी, घाईघाईत दहीहंडी फोडली”
आदित्य ठाकरे महाराष्ट्र फिरत आहेत. तुम्हीही लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. सर्व उपनेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढा. तसेच, आपण आपली कामं जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे. त्यासाठी आपल्या प्रत्येक घराघरात पोहचावं लागणार आहे आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा अर्थ जनता आपल्या सोबत आहे. असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “गद्दारांचे हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार म्हणजे कोसळणार”
- “गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र..;”छगन भुजबळांची प्रतिक्रिया
- “आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद, याचा अर्थ जनता आपल्यासोबत”; उद्धव ठाकरे
- “शेलार, दरेकर स्वत: च्या भावाला निवडून आणू शकले नाही अन्..;” पेडणेकरांचा हल्लाबोल
- “गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं, बाबाजी का ठुल्लू,”आदित्य ठाकरेंचा घणाघात