परभणी : शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिंदे गट फिंदे गट काही नाही, आम्ही शिवसेना असल्याचा दावा संतोष बांगर यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतून ४० आमदारांचा गट शिवसेनेतून बाहेर पडला. त्यानंतर बंडखोर आमदारांना शिंदे गट म्हणून म्हटलं जात आहे. त्यावरून आता संतोष बांगर यांनी परभणीत हे विधान केलं आहे.
“गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं, बाबाजी का ठुल्लू,”आदित्य ठाकरेंचा घणाघात
परभणी जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यासाठी संतोष बांगर परभणीत आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यात हे लोक शिंदे गट म्हणून आम्हाला सांगत आहेत, परंतु शिंदे गट फिंदे गट काही नाही, खरी शिवसेना आम्हीच आहे. येणाऱ्या काळातील नगरपरिषदा, नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकांमध्ये याचा परिणाम होऊ शकतो. तसेच या सर्व ठिकाणी भगवा झेंडा आपण डौलाने फडकवणार असंही संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.
“देशातील काही महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न”; छगन भुजबळ
अखेरच्या क्षणी संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांना अनेक वेळा गद्दार गद्दार म्हणून शिवसैनिकांकडून डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर संतोष बांगर शिवसैनिकांना जोरदार प्रत्युत्तर देखील देत आहेत. यातच त्यांच्या आता विविध ठिकाणी जाहीर सभा मोठ्या प्रमाणात गाजत असून विरोधकांवर चांगलीच तोफ डागत आहेत.
“सत्ता तुमची पण आमदार मीच, आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढू”; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सज्जड दम
दरम्यान, अलिकडेच एका संस्थामध्ये निकृष्ठ भोजन दिल्याप्रकरणी संतोष बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. याचा पडसाद विधानसभेत देखील पडले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांना समज देखील दिली होती.
Read also
- फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी अन् कबुली
- “गद्दारांचे हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार म्हणजे कोसळणार”
- “गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र..;”छगन भुजबळांची प्रतिक्रिया
- “आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद, याचा अर्थ जनता आपल्यासोबत”; उद्धव ठाकरे
- “शेलार, दरेकर स्वत: च्या भावाला निवडून आणू शकले नाही अन्..;” पेडणेकरांचा हल्लाबोल