मुंबई : भाजप नेते मोहिते कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा एक मोठा घोटाळा पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असल्याचं ट्विट कले होतं. सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी देखील मोहित कंबोज यांनी केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची चौकशी होणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पुन्हा एक ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद, याचा अर्थ जनता आपल्यासोबत”; उद्धव ठाकरे
बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची केस स्टडी सध्या मी अभ्यास करत आहे. त्या केस स्टडी संदर्भात संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येणार आहे, असा इशारा कंबोज यांनी रोहित पवार यांना दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कंबोज यांच्या यापुर्वीच्या ट्विटला उत्तर दिले होते. पवारांच्या या उत्तरानंतर कंबोज यांनी रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीतील घोटाळा लवकरच बाहेर काढणार असा इशारा कंबोज यांनी ट्विट करत दिला आहे.
“शेलार, दरेकर स्वत: च्या भावाला निवडून आणू शकले नाही अन्..;” पेडणेकरांचा हल्लाबोल
भाजप नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांंपुर्वी माझं ट्विट सेव्ह करून ठेवा ! अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊतांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुख यांच्या भेटीला जाणार आहे. जेलवारीसाठी तयार रहा ! असं ट्विट करत राष्ट्रवादी पक्षावर निशाणा साधला होता. यामुळे राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
“गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं, बाबाजी का ठुल्लू,”आदित्य ठाकरेंचा घणाघात
रोहित पवार संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आले असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, मोहित कंबोज यांच्या ट्विटला फारसे महत्व देण्याचं काम नाही, मोहित कंबोज यांनी स्वत: ओव्हरसिज बँकेतील 52 कोटी बुडवत जनतेला चुना लावला होता, आता त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केला होता.
Read also
- “विनायक मेटेंना तात्काळ उपचार का मिळाला नाही”; फडणवीसांनी सांगितलं खरं कारण
- “शिंदे गट फिंदे गट काही नाही, आम्हीच खरी शिवसेना”; संतोष बंगार यांचा शिवसेनेवर दावा
- फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी अन् कबुली
- “गद्दारांचे हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार म्हणजे कोसळणार”
- “गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र..;”छगन भुजबळांची प्रतिक्रिया