मुंबई : पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा प्रभाव वाढत आहे याबाबत विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी चर्चा करण्यात आली. याबाबत राज्य शासनाने काय उपाययोजना केली अशी विचारणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केली . त्यावरील लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्यांचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले व डासांची घनता काढली असे आरोग्यमंत्र्यांक़डून उत्तर दिले होते. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आरोग्य खात्याच्या एका विषयावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टोलेबाजी केली आहे.
फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी अन् कबुली
एकूण किती डास पकडले? डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले? यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का? असे गमतीशीर प्रश्न भुजबळ यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना विचारले. भुजबळ यांच्या अशा प्रश्नामुळे विधिमंडळात एकच हश्या पिकला.
“गद्दारांचे हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार म्हणजे कोसळणार”
पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा प्रभाव वाढत आहे. याबाबत राज्य शासनाने काय उपाययोजना केली अशी विचारणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केली होती. त्यावरील लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्यांचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले व डासांची घनता काढली असे उत्तर दिले होते. या अजब उत्तरावर आमदार छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली आहे.
“गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र..;”छगन भुजबळांची प्रतिक्रिया
पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… राज्य सरकारविरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीतील आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, पन्नास खोके, माजलेत बोके, पन्नास खोके, एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, गद्दारांचं सरकार हाय हाय, अशा घोषणा देत आज पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.
Read also
- “700 वर्षापुर्वीच्या राम, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मुर्त्या चोरीला”; विधानसभेत चर्चा
- “मोहित कंबोजने नाक घासावं अन् मेदु शिल्लक असेल तर आपल्या भागाचा विकास करावा”
- मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर आता रोहित पवार; ट्विट करत दिली माहिती
- “विनायक मेटेंना तात्काळ उपचार का मिळाला नाही”; फडणवीसांनी सांगितलं खरं कारण
- “शिंदे गट फिंदे गट काही नाही, आम्हीच खरी शिवसेना”; संतोष बंगार यांचा शिवसेनेवर दावा