मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये दहीहंडीला खेळाचा दर्जा देत गोविंदांना सरकारी नोकरीत विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर मंगळागौरीला साहसी खेळाचा दर्जा द्या, असा टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
“आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, शिवसेनेसह, शिंदे गटावर टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जनतेनंच बोललं पाहिजे. राज्यकर्ते तमाशा करतायत, पण नागरिकांना त्याची काहीच पडलेली नाही, हे जोपर्यंत चालेल तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
“सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”
दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णयावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राजकारण हा गंभीर विषय आहे मात्र या सरकारच्या भाषेत आपण राजकारणाला खेळाचा दर्जा दिला आहे. दहीहंडीलाही दर्जा दिला आता मंगळागैरीला देतील, असा टोला लगावत लग्न झाल्या झाल्या हार घातल्यावर खेळाचा दर्जा दिला पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.
“इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं
मनसेने एक आंदोलन अर्धवट सोडले असे दाखवा. राज्यातील 65 ते 67 टोलनाके आपण बंद केले. माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. जे टोल बंद झाले, त्यांनी आशीर्वाद दिले. सत्ता हातात द्या बाकीचे टोलनाके बंद करतो. या सर्वांना टोलवाल्याकडून पैसे जातात त्यामुले ते टोल बंद करत नाहीत. हे कधी त्यांना प्रश्न देखील विचारत नाहीत. इतक्या पत्रकार परिषदा होतात पण कोणी प्रश्न का विचारत नाही. त्यांचे छुपे लोक आपल्याबद्दल प्रचार करतात. आजपर्यत मनसेने जेवढी आंदोलने केली तेवढी आंदोलने कोणी केली नाहीत आम्ही ती यशस्वी देखील करून दाखवली, असही राज ठाकरे म्हणाले.
Read also
- “माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो”
- “माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, माझ्याकडे विचार आहे”; राज ठाकरेंचा शिंदे- उद्धव ठाकरेंना टोला
- “शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या, त्यामुळेच शिंदे गटात”; सेनेचा माजी आमदार शिंदे गटात
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
- “शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?