मुंबई : शस्त्रक्रियेनंतर प्रथमच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर देखील भाष्य केले. सोबतच मनसेने एक आंदोलन अर्धवट सोडले असे दाखवा. राज्यातील 65 ते 67 टोलनाके आपण बंद केले. माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
“सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”
महाविकास आघाडीसह भाजपवर राज ठाकरे यांनी टीका केली. शिवसेना भाजपच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं, महाराष्ट्र टालमुुक्त करू मात्र त्यांना कोणी प्रश्न विचारला नाही. मला वाटते या गोष्टी तुम्हाला जिल्हा, तालुक्यात, शहरात बोलतात तेव्हा तुम्ही सांगितले पाहिजे. आम्ही एवढे टोल बंद केले. तुमच्या पक्षांनी काय केलं. आश्वासन देऊनही तुम्ही टोल का बंद केलं नाहीत हे सांगितले पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
“इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं
काही गोष्टी तुमच्याकडून लोकांपर्यत गेल्या पाहिजेत. आपल्याला रोखण्यासाठी अनेक माध्यमे अनेक राजकीय पक्ष जाणून बुजून काही गोष्टींचा प्रचार करतात. तुुम्ही सक्षम आहात. आपला पहिला मुद्दा होता टोल. जगभरात टोल वर पैसा गोळा करतो. त्यातून ब्रिज आणि रस्त्याची रक्कम गोळा करतात. गोळा झालेला पैसा कोणाकडे जातो. त्याचं पुढे काय होतं. याचं उत्तर आजपर्यंत सरकारकडून दिलं गेलं नाही, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
“निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
जे टोल बंद झाले, त्यांनी आशीर्वाद दिले. सत्ता हातात द्या बाकीचे टोलनाके बंद करतो. या सर्वांना टोलवाल्याकडून पैसे जातात त्यामुले ते टोल बंद करत नाहीत. हे कधी त्यांना प्रश्न देखील विचारत नाहीत. इतक्या पत्रकार परिषदा होतात पण कोणी प्रश्न का विचारत नाही. त्यांचे छुपे लोक आपल्याबद्दल प्रचार करतात. आजपर्यत मनसेने जेवढी आंदोलने केली तेवढी आंदोलने कोणी केली नाहीत आम्ही ती यशस्वी देखील करून दाखवली, असही राज ठाकरे म्हणाले.
Read also
- “माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, माझ्याकडे विचार आहे”; राज ठाकरेंचा शिंदे- उद्धव ठाकरेंना टोला
- “शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या, त्यामुळेच शिंदे गटात”; सेनेचा माजी आमदार शिंदे गटात
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
- “शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?
- “आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”