मुंबई : औरंगजेबाची औलाद ओवेसीच्या नगरसेवकांच्या जीवावर विधानपरिषदेत आमदार झाले. त्यानंतर लॉटरीमध्ये विरोधीपक्ष नेतेपद मिळालेले शिल्लक सेनेचे अंबादास दानवेंना मिळालं. त्यांच्या पक्षप्रमुखांनी हिंदुत्व गुंडाळून ठेवून राष्ट्रवादीची तळी उचलल्यामुळे त्यांचा पक्ष संपलाय याचा विसर पडलेला आहे, असा टोला मनसे नेते गजानन काळे यांनी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंना लगावला आहे.
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील 18 मंत्र्यांना बंगले जाहीर; पाहा संपुर्ण यादी
हिंदूत्वाच्या खऱ्या-खोट्या गप्पा मारायच्या, मात्र स्वत: अंबादास दानवे संभाजीनगरमधुन विधान परिषदेवर आमदार म्हणुन निवडून जाताना ती औरंगजेबाची औलाद ओवेसीच्या, एमआयएमच्या नगर सेवकांच्या जीवावर निवडून येतात. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीची तळी उचलुन स्वत:चा पक्ष संपवला आहे. याची आठवण मला आंबादास दानवे यांना करून देण्याची गरज आहे. लॉटरीमध्ये विरोधीपक्षनेते पद मिळालं म्हणुन काहीही बोलू नका, असा इशारा मनसे नेते गजानन काळे यांनी अंबादास दानवे यांना दिला आहे.
बारामतीचा पोपट अशा पद्धतीने जर विरोधी पक्षनेते म्हणुन बोलायला लागला तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला जोड्याने मारल्या शिवाय राहणार नाही, अशा शब्दात मनसे नेते गजानन काळे यांनी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
यासोबतच, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यावर आमनेसामने येत दोन्ही बांजूच्या नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायऱ्यावर मोठा राडा बघायला मिळाला. यावरून महाराष्ट्राचे राजकारण हे लोक कोणत्या दिशेला घेवून चालले आहेत. राजसाहेब बोलले ते अगदी खरं होताना दिसत आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राडा करणाऱ्यांना आमदार म्हणायला लाज वाटावी असे वर्तन सुरू आहे, अशी टीका मनसे नेते गजानन काळे यांनी केली आहे.
Read also
- “शिंदे गटातील आमदारांकडून आई-बहिणींवरून शिवीगाळ”; मिटकरींचा गंभीर आरोप
- “आम्ही दिलेल्या घोषणा शिंदे गटाला झोंबल्या”; अजित पवारांचं सत्ताधारी आमदारांना टोमणा
- “इडी सरकारने राज्यातील सत्ता ओरबडून घेतलीय, जनता माफ करणार नाही”; सुप्रिया सुळे
- चुकून पाय लागला तर वाकून नमस्कार करू, परंतु जर..; शिंदे गटाचे आमदार आक्रमक
- एका व्यक्तीने जाळून घेतले, तर दुसरा थेट मंत्रालयावर आत्महत्येसाठी चढला; विधानसभेत खडाजंगी