पुणे : राज्यात इडीच्या सरकारने साम, दाम, दंड, भेद असे काहीही करून सत्ता मिळवणारे सरकार सत्तेत आहे. 50 खोके ऑल ओकेवाले सरकार असून या सरकारची सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता आलेली नाही. सत्ता ओरबडून घेतली आहे. त्यामुळेच सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. हे दुर्दैव असल्याची खंत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
“आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
देशभरात महागाई हा मोठा प्रश्न आहे. मात्र भाजपची मोठी खेळी आहे. लोकांना मुळ मुद्यांपासून भरकटवण्यासाठी काहीतरी वेगळेच मुद्दे काढण्याचा प्रयत्न सूरू आहे. सातत्याने लोकांना भुलवत राहायचे ही त्यांची पद्धत आहे. राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत आहे. मात्र सरकारला त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी लावला.
“आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
बारामती तालुक्यातील सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी आल्या असता त्या बोलत होत्या. राज ठाकरे यांनी काल मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सत्ता दिल्यास सर्व टोल माफ करणार असल्याचे म्हटले होते. त्यावर त्या म्हणाल्या कीस याचे आपल्याला काहीही आश्चर्य वाटत नाही. राज्यात महिलांवरील अत्यांचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. परंतु काही ठिकाणी पोलीस चांगले काम करीत आहेत. असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
“दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, आता हे मंगळागौरीला पण देतील”; राज ठाकरेंचा शिदेंना टोमणा
दरम्यान, आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याने विधिमंडळाच्या पायऱ्यावर मोठा राडा बघायला मिळाला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि बंडखोर आमदार महेश शिंदे यांच्यात मोठी बाचाबाची झाली. यावेळी विरोधकांनी तसेच सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर जोरदार घोषणाबाजी दिली.
Read also
- चुकून पाय लागला तर वाकून नमस्कार करू, परंतु जर..; शिंदे गटाचे आमदार आक्रमक
- एका व्यक्तीने जाळून घेतले, तर दुसरा थेट मंत्रालयावर आत्महत्येसाठी चढला; विधानसभेत खडाजंगी
- एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील 18 मंत्र्यांना बंगले जाहीर; पाहा संपुर्ण यादी
- “शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या, त्यामुळेच शिंदे गटात”; सेनेचा माजी आमदार शिंदे गटात
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
- “शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?