मुंबई : आम्ही दिलेल्या घोषणा शिंदे गटाला एवढ्या झोंबल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील विरोधी पक्षातील आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबीजी करत होते. मात्र आम्ही कधी त्यांना आडवले नाही. महाराष्ट्रामध्ये या घोषणा दाखवल्या गेल्या त्यामुळे लोकांच्या मनात या आमदारांची प्रतिमा निर्माण झाली का काय अशी शंका सत्ताधारी आमदारांना आली आहे. चोराच्या मनात चांदणं असं म्हणत त्या घोषणा त्यांना झोंबल्या आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यावर आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बांजूच्या नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायऱ्यावर मोठा राडा बघायला मिळाला.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
अधिवेशनाच्या सुरूवातीपासुन महाविकास आघाडीचे सगळे आमदार एकत्र येत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्याचं काम करत आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देत होतो. या घोषणा त्यांच्या एवढ्या जिवारी लागली आहे ते यामुळे नाराज झालेले दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यातील काही आमदारांनी आज समोर येऊन घोषणाबाजी केली आहे, असं अजित पवार म्हणाले.
“आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
शिंदे गटातील बंडखोर आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रावादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या काही बाचाबाची झाली. शिंदे गटातील आमदारांनी शिवीगाळ केली आहे, असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. आई-बहीणीवरून शिंदे गटातील आमदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घडलेला प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही, असं देखील मिटकरी म्हणाले.
“आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
सोबतच, चुकून पाय लागला तर वाकून नमस्कार करू, परंतु आम्हाला कुणी पाय लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही सोडणार नाही. जो येईल अंगावर त्याला घेऊ शिंगावर असा इशारा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे. यावरून तुमच्या अंगावर कोणी आलंच नाही तर शिंगावर घेण्याचा प्रश्नच नाही असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.
Read also
- “इडी सरकारने राज्यातील सत्ता ओरबडून घेतलीय, जनता माफ करणार नाही”; सुप्रिया सुळे
- चुकून पाय लागला तर वाकून नमस्कार करू, परंतु जर..; शिंदे गटाचे आमदार आक्रमक
- एका व्यक्तीने जाळून घेतले, तर दुसरा थेट मंत्रालयावर आत्महत्येसाठी चढला; विधानसभेत खडाजंगी
- एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील 18 मंत्र्यांना बंगले जाहीर; पाहा संपुर्ण यादी
- “शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या, त्यामुळेच शिंदे गटात”; सेनेचा माजी आमदार शिंदे गटात