मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रावादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या आज बाचाबाची झाली. विधानसभेच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा राडा झाला. यावेळी शिंदे गटातील आमदारांनी शिवीगाळ केली आहे, असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. आई-बहीणीवरून शिंदे गटातील आमदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घडलेला प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही, असं देखील मिटकरी म्हणाले.
महाविकास आघाडीची काल बैठक झाली होती. या बैठकीत ठरलं होतं की, सध्या शेतकरी अडचणीत असल्याने सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज सकाळी साडेदहा वाजता आंदोलन करण्यात यावं. या आंदोलनासाठी आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमलो होतो. आंदोलन शांतपणे सुरू होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार महेश शिंदे यांनी आम्हाला धक्काबुक्की कऱण्याचा प्रयत्न केला. तसेत त्यांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ कऱण्याचाही प्रयत्न केला असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
आम्ही दिलेल्या घोषणा शिंदे गटाला एवढ्या झोंबल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील विरोधी पक्षातील आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबीजी करत होते. मात्र आम्ही कधी त्यांना आडवले नाही. महाराष्ट्रामध्ये या घोषणा दाखवल्या गेल्या. त्यामुळे लोकांच्या मनात या आमदारांची प्रतिमा निर्माण झाली का काय अशी शंका सत्ताधारी आमदारांना आली आहे. चोराच्या मनात चांदणं असं म्हणत त्या घोषणा त्यांना झोंबल्या आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यावर आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बांजूच्या नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायऱ्यावर मोठा राडा बघायला मिळाला.
“आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पाचवा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापसून विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. या घोषणाबाजी वरून सभागृहात देखील दोन गटांत चांगलच वाद झालेला पाहायला मिळाला होता. त्यातच आज भाजप व शिंदे गटाच्या आमदारांनी आज विरोधी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर विरोधी पक्षाचे आमदार व सत्ताधारी आमदार यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.
Read also
- “आम्ही दिलेल्या घोषणा शिंदे गटाला झोंबल्या”; अजित पवारांचं सत्ताधारी आमदारांना टोमणा
- “इडी सरकारने राज्यातील सत्ता ओरबडून घेतलीय, जनता माफ करणार नाही”; सुप्रिया सुळे
- चुकून पाय लागला तर वाकून नमस्कार करू, परंतु जर..; शिंदे गटाचे आमदार आक्रमक
- एका व्यक्तीने जाळून घेतले, तर दुसरा थेट मंत्रालयावर आत्महत्येसाठी चढला; विधानसभेत खडाजंगी
- एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील 18 मंत्र्यांना बंगले जाहीर; पाहा संपुर्ण यादी