मुंबई : आज आम्ही त्या ठिकाणी आमची भुमिका मांडण्याचा प्रयत्न केला. शांततेत आंदोलन सुरू होते. अचानक विरोधी पक्षाचे आमदार पुढे आले व आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गेल्या अडीच वर्षात जो गैरकारभार माविआने केलेला आहे. त्याचा पर्दाफाश आम्ही मिडीयासमोर करत होतो तो त्यांना सहन झाला नाही, असं कोरेगावचे आमदार महेश शिंदे म्हणाले. विधिमंडळाच्या राड्यानंतर त्यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला.
“अंबादास दानवे बारामतीचा पोपट, राष्ट्रवादीची तळी उचलुन स्वत:चा पक्ष संपवला”; मनसेचा हल्लाबोल
गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचे अर्थखाते धुवून खाऊन बारामतीला नेले ते बाहेर येईल याची भिती वाटल्याने विरोधकांनी आमचे आंदोलन दाबले. मिटकरी महाराष्ट्राच्या राजकारणातला काळा डाग आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आम्हाला ढकलले, गाजर दाखवले, धक्काबुक्की केली, चुकीची भाषा वापरली अशा पद्धतीचं गैरवर्तन महाराष्ट्राला अशोभनिय आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.
“शिंदे गटातील आमदारांकडून आई-बहिणींवरून शिवीगाळ”; मिटकरींचा गंभीर आरोप
एखादे प्रकरण दुसऱ्या दिशेला कसं न्यायचे व आपली चुक उघडकीस येईल या भितीने दुसऱ्या दिशेला नेण्याचा विरोधकांचा हा केविलवाणा प्रयत्न होता. पत्रकारांना कोणीही धक्काबुक्की केली नाही. आमच्या घोषणाबाजीतुन सत्य बाहेर येत होते. हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी हे कृत्य केलं. कारण त्यांना सत्य कटू वाटले असावे. आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी करणार असल्याचंही महेश शिंदे म्हणाले.
“आम्ही दिलेल्या घोषणा शिंदे गटाला झोंबल्या”; अजित पवारांचं सत्ताधारी आमदारांना टोमणा
विधानभवनाबाहेर झालेला प्रकार शंभर टक्के निषेदार्थ आहे. सगळ्यांनी आचारसंहिता पाळणे आवश्यक आहे. आमच्या आंदोलनात विरोधी पक्षाच्या आमदारांनी येणे चुकीचे आहे. त्यांचे आंदोलन सुरू असताना आमच्यातील कोणीही तेथे गेले नाही. पण त्यांचे आमदार आदोलनाच्या ठिकाणी आले, त्यांनी संकेत पाळायला हवे होते, असंही महेश शिंदे म्हणाले.
Read also
- माझ्याघरी सहा महिन्यापासुन मीटर नाही; आमदारांनी विधानसभेत मांडली व्यथा, फडणवीसांचं उत्तर
- विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मोठा राडा; मिटकरींनी सांगितला सगळा घटनाक्रम
- “घरातून बाहेर न पडणारे कसे निवडणुक जिंकणार?”; प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं
- “सरळसेवा भरतीत 2 लाख 193 पदे रिक्त”; शंभुराजे देसाई म्हणाले, “सर्व भरती होणार”
- “जे जे हॉस्पिटलमध्ये कुत्रे बसून होते, प्रशासन काय करतंय”; अन् अजित पवार चांगलेच संतापले