मुंबई : युवराजांची दिशा चुकली, पर्यावरण खातं त्यांनी घरात राहून सांभाळलं, अशी घोषणाबाजी आज सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली. शिंदे गट व भाजपच्या आमदारांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार घोषणाबाजी करत निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर गद्दार सरकारमध्ये एका मंत्रिपदासाठी काय काय करावे लागत आहे, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
“अमोल मिटकरी महाराष्ट्राच्या राजकारणातला काळा डाग, त्यांनी आम्हाला गाजर दाखवले”
आज जे काही बंडखोर आमदारांनी केलं आहे त्यातुन त्यांच्यावर झालेले संस्कार दिसत आहेत. पाठीत खंजिर खुपसने हे बाळासाहेबांचे हिंदुत्व नाही. लोकांना एकत्र घेऊन काम करणे, लोकांचे प्रश्न सोडवणे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, बेरोजगारी दुर करणे हे शिवसेनेचे हिंदुत्व आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं जे चाललं आहे ते रावण राज आहे राम राज नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
माझ्याघरी सहा महिन्यापासुन मीटर नाही; आमदारांनी विधानसभेत मांडली व्यथा, फडणवीसांचं उत्तर
पर्यटन खातं घेऊन जगभर वारी करायची नसते. आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आमचे दौरे सुरूच राहतील. गद्दार सरकारमध्ये एका मंत्रिपदासाठी किती काय काय करावे लागत आहे हे आज महाराष्ट्राने पाहिलं आहे. गेलेल्या आमदारांची मला कीव येत आहे. गेलेल्या आमदारांना मंत्रिपदे नाहीत त्यांना गळ्यात घालुन पायऱ्यांवर उभं राहावं लागत आहे. आम्हाला शिव्या द्या म्हणजे तुम्हाला मंत्रिपदं मिळतील असं या सरकारचं चालु आहे. गेलेल्या 40 लोकांनी राजिनामा द्या मी पण लगेच राजिनामा देतो. दोघंही निवडणुकांना सामोरे जाऊ, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मोठा राडा; मिटकरींनी सांगितला सगळा घटनाक्रम
2014 ला 151 चा हट्ट धरून युती बुडवली, 2019 ला खुर्चीसाठी हिदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली..पर्यटन खाते घेऊन घरातच बसुन केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर..पुन्हा निवडणूक लढवायचे देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन..खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार..जनता हे खोटे अश्रू पुसणार नाही, तुमचा या खोट्या रडगाण्यावर भुलणार नाही..असा मजकुर असलेला पोस्टर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाकडून दाखवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
Read also
- ‘युवराजांची दिशा चुकली’; सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
- “त्यामुळेच आपली मान शरमेने खाली जाते”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- औरंगाबादमध्ये काँग्रेस, राष्ट्रावादीच्या नगरसेवकांना जुगार खेळताना अटक
- “GST च्या रूपात केंद्र सरकारचा माणुस घरात जेवतोय असं आता लोकांना वाटतंय”; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- सत्ताधाऱ्यांना निवडणुकीची भिती; आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर