मुंबई : राज्यात पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा आणि शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासुनच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर खुप गदारोळ होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या काही दिवसात विरोधी पक्षातील आमदारांनी सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला तर आता सत्ताधारी पक्षाने शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना डिवचलं आहे. आदित्य ठाकरे यांची दिशा चुकली, पर्यावरण खातं त्यांनी घरात राहून सांभाळलं, अशा घोषणाबाजी करत निशाणा साधला आहे.
माझ्याघरी सहा महिन्यापासुन मीटर नाही; आमदारांनी विधानसभेत मांडली व्यथा, फडणवीसांचं उत्तर
शिंदे गट व भाजपच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज घोषणाबाजी केली आहे. यावेळी आमदारांच्या हातात एक पोस्टर पाहायला मिळत आहे. आमदारांच्या हातात आदित्य ठाकरे यांचं व्यंगचित्र काढलेला पोस्टर आहे. या पोस्टरमध्ये आदित्य ठाकरे गाढवावर उलटे बसल्याचं दिसत आहे. सोबतच विरोधक जोरदार घोषणाबाजी देखील करताना दिसत आहेत.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मोठा राडा; मिटकरींनी सांगितला सगळा घटनाक्रम
2014 ला 151 चा हट्ट धरून युती बुडवली, 2019 ला खुर्चीसाठी हिदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली..पर्यटन खाते घेऊन घरातच बसुन केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर..पुन्हा निवडणूक लढवायचे देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन..खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार..जनता हे खोटे अश्रू पुसणार नाही, तुमचा या खोट्या रडगाण्यावर भुलणार नाही..असा मजकुर असलेला पोस्टर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाकडून दाखवण्यात येत आहे.
“घरातून बाहेर न पडणारे कसे निवडणुक जिंकणार?”; प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं
यासोबतच, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नाका आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले आहे रडायचं नाही लढायचं त्या प्रमाणे अम्ही लढत आहोत. काल झालेला प्रकार निंदनीय आहे. सगळेच वारसदार बाळासाहेब होऊ शकतात का?, असं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले आहेत.
Read also
- “त्यामुळेच आपली मान शरमेने खाली जाते”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- औरंगाबादमध्ये काँग्रेस, राष्ट्रावादीच्या नगरसेवकांना जुगार खेळताना अटक
- “GST च्या रूपात केंद्र सरकारचा माणुस घरात जेवतोय असं आता लोकांना वाटतंय”; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- सत्ताधाऱ्यांना निवडणुकीची भिती; आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर
- “अमोल मिटकरी महाराष्ट्राच्या राजकारणातला काळा डाग, त्यांनी आम्हाला गाजर दाखवले”