मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा आणि शेवटचा दिवस आहे. आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू झाला नाही, असं आदिवासी मंत्री विजयकुमार गवीत म्हणाले. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी योग्य आकडेवारी जाहीर करा अशी मागणी केली. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री गवीत यांच्या उत्तराने राष्ट्रवादीचे नेते व शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे संतापल्याचं पाहायला मिळालं.
आदिवासी भागातील परिस्थिती कशी असते, याची आपल्याला लाज वाटायला हवी, राखीव उत्तरे होऊनही तेच उत्तर दिलं जात आहे. सर्वपक्षीय समिती स्थपन करून मंत्री तोडगा काढणार आहेत का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. मात्र आदित्य ठाकरे यांनी सभगृहात लाज या शब्दाचा उल्लेख केल्याने त्यांच्यावर आक्षेप घेत भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले. यानंतर शिवसेनेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर चांगलेच आक्रमक झाले.
सत्ताधाऱ्यांना निवडणुकीची भिती; आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर
आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेप घेत पित्याबद्दल आपण असं बोलतो का, ते ज्येष्ठ नेते आहेत, असं मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मुनगंटावार यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात आक्रमक भुमिका घेतली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे परिस्थितीबाबत बोलले आहेत, मंत्र्याविषयी ते वक्तव्य नाही, असा जयंत पाटील यांनी युक्तीवाद करत आदित्य ठाकरे यांची बाजु मांडण्याचा प्रयत्न केला.
“अमोल मिटकरी महाराष्ट्राच्या राजकारणातला काळा डाग, त्यांनी आम्हाला गाजर दाखवले”
सुधीरभाऊंची भाषणं ऐकून मी प्रेरित झालेलो आहे. मी एवढचं म्हणालो की स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षी ही परिस्थिती आहे. त्यात मला सरकारला दोष द्यायचा नाही, पण नेते म्हणून ते आपल्याला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. यात मी काय चुकीचं बोललो नाही. मी कोणाकडे बोट दाखवलं नाही, आपण फक्त नेते म्हणुन काम करायला हवं, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.
Read also
- “महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचा आहे का?”; आमदारांच्या धक्काबुक्कीचा राज ठाकरेंकडून निषेध
- “गद्दार सरकारमध्ये मंत्रिपदासाठी काय काय करावे लागते”; आदित्य ठाकरेंचा पलटवार
- ‘युवराजांची दिशा चुकली’; सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
- “त्यामुळेच आपली मान शरमेने खाली जाते”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- औरंगाबादमध्ये काँग्रेस, राष्ट्रावादीच्या नगरसेवकांना जुगार खेळताना अटक