मुंबई : शिवसेनेशी कोणताही पक्ष युती करायला तयार नाही. आता संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरेंचा आव आणून दाखवण्याचा प्रयत्न आहे. शिवसेनेची संभाजी ब्रिगेड सोबत युती म्हणजे फुसका बार, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवणार आहोत. लक्षात ठेवा झंडू बाम घेऊन ठेवा, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी चंद्रशेखर बावनकुळे व गिरीश महाजन यांना दिला आहे.
“सत्तेविना मती गेली, जो मिळाला त्याच्याशी युती केली”; मनसेचा उद्धव ठाकरेेंना टोला
चंद्रशेखर बावनकुळे यांना पोटशूळ का उठाला आहे. संभाजी ब्रिगेडची भिती का वाटते. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एका दिवसाच्या युतीचं टेन्शन का घेतलं आहे, गिरीश महाजन तुम्हाला काठीचा आधार वाटतो का? लक्षात ठेवा झंडू बाम घेऊन ठेवा, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड तुमचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला आहे.
“उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही”; नवनीत राणांचा ठाकरेंना टोला
आम्ही कामाच्या माध्यमातून दहशत निर्माण करू. आम्हाला घाणेरड्या राजकारणात पडायचं नाही. जो भगवा शिवसेनेचा आहे तोच भगवा संभाजी ब्रिगेडचा आहे. झेंडा पण आमचा आहे व दांडा पण आमचा आहे. सत्तेत आहात म्हणुन मस्ती दाखवू नका, असही संतोष शिंदे म्हणाले.
“काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत मात्र सभागृहाच्या पायऱ्यांवर जोर जोरात बोंबलतात”
आम्ही नवीन आहोत म्हणजे गाफील आहे असं समजू नका. प्रबोधनकार ठाकरे आणि पुरूषोत्तम खेडेकर यांच्या विचारावर वाटचाल करून विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवू, असं संतोष शिंदे म्हणाले.
Read also
- “हेच अडाणी लोक महाराष्ट्राचे वाटोळे करणार”; रूपाली ठोंबरे-पाटील
- “केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये”; पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षाला घरचा आहेर
- “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रडीचा डाव सुरू!”; किशोरी पेडणेकर
- पुन्हा मोदीच! जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी अव्वलस्थानी
- शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार?; भाजपकडून हलचाली सुरू