मुंबई : दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मी अजुन या संबंधित महापालिकेला पत्र दिलेल नाही, असं शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर म्हणाले. त्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार, असं शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
“राष्ट्रवादीची ‘बी’ टीम ब्रिगेड बरोबर राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम नवाब सेनेची युती”; मनसेचा शिवसेनेला टोला
महापालिकेला आपली भुमिका स्पष्ट करावी लागेल. कारण दर वर्षी 5 कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 56 वर्षांची परंपरा आहे. शिवसेना कोणाची हे कोर्टात सुरू आहे याच्याशी महापालिकेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे दबावाखाली येत महापालिकेने निर्णय घेऊ नये. दरवर्षि प्रमाणे शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी दिली पाहिजे, असं पेडणेकर म्हणाल्या.
“नितेश राणे रात्री पत्र लिहतात काय?”; किशोरी पेडणेकरांचा राणेंना टोला
सरकारकडून रडीचा डाव फार मोेठ्या प्रमाणात खेळला जात आहे. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी भाजपसोबत गेला आहात तर नक्की तुमचा फायदा करून घ्या. पण ज्या घरात तुम्ही लहानाचे मोठे झालात त्याचा अंत करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा.., असा इशारा किशोरी पेडणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केलेल्या उपकारांची जाणिव ठेवुन यामध्ये तुम्ही मध्यस्थी घेऊ नका, अशी विनंती पेडणेकरांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना केली आहे.
“फुसक्या बारला युवराज वगैरे म्हणू नका”
सोबतच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळाव्या संदर्भात काय निर्णय आहे हे मला माहित नाही. ते मेळावा घेणार आहेत का याचीही मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहेत का यांचीही मला कल्पना नाही. राज्याचा गृहमंत्री म्हणुन एवढच सांगतो जे नियमात आहे तेच करू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Read also
- पुन्हा मोदीच! जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी अव्वलस्थानी
- शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार?; भाजपकडून हलचाली सुरू
- “सत्तेविना मती गेली, जो मिळाला त्याच्याशी युती केली”; मनसेचा उद्धव ठाकरेेंना टोला
- “उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही”; नवनीत राणांचा ठाकरेंना टोला
- “काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत मात्र सभागृहाच्या पायऱ्यांवर जोर जोरात बोंबलतात”