मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कवर होतो. येत्या 5 ऑक्टोंबर रोजी दसरा आहे. मात्र यंदा शिवसेनेची ही परंपरा खंडीत होण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फुट पाडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांचे सर्व अधिकार आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरेबरच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान शिंदे गटाला मिळावं यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी हे मैदान कोणाला मिळाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“फुसक्या बारला युवराज वगैरे म्हणू नका”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळाव्या संदर्भात काय निर्णय आहे हे मला माहित नाही. ते मेळावा घेणार आहेत का याचीही मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहेत का यांचीही मला कल्पना नाही. गृहमंत्री म्हणुन एवढच सांगतो जे नियमात आहे तेच करू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार”; उद्धव ठाकरेंची मोेठी घोषणा
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून “विनाश काले विपरीत बुद्धि”, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. यासोबतच, काँग्रेसची परिस्थिती बुडणाऱ्या जहाजासारखी झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते पक्ष सोडत आहेत. काँग्रेसला वाचवनं अशक्य झालं आहे, त्यामुळे गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेस मधुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचा हा अंतर्गत प्रश्न आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मला घरी जायचं आहे..माझे प्रश्न लवकर घ्या”; केसरकरांच्या विनंतीने सभागह आवाक
दसरा मेळाव्यासाठी नेहमी मीच पत्र देतो. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मी अजुन पत्र दिलेलं नाही अधिकारी माझ्या पत्राची वाट बघत आहेत म्हणुन त्यांनी शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही, असं शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर म्हणाले.
Read also
- “सत्तेविना मती गेली, जो मिळाला त्याच्याशी युती केली”; मनसेचा उद्धव ठाकरेेंना टोला
- “उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही”; नवनीत राणांचा ठाकरेंना टोला
- “काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत मात्र सभागृहाच्या पायऱ्यांवर जोर जोरात बोंबलतात”
- “राष्ट्रवादीची ‘बी’ टीम ब्रिगेड बरोबर राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम नवाब सेनेची युती”; मनसेचा शिवसेनेला टोला
- “नितेश राणे रात्री पत्र लिहतात काय?”; किशोरी पेडणेकरांचा राणेंना टोला