औरंगाबाद : शिवसेना आणि शिंदे गटातील नेते एकमेंकावर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. अशातच एका कार्यक्रमात शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे एका मंचावर उपस्थित होते. मात्र कार्यक्रमात पहिला सत्काराचा मान चंद्रकांत खैरे यांना दिला म्हणुन आमदार संजय शिरसाट थेट व्यासपीठावरून मार्गस्थ होऊ लागले होते. मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची समजुत काढत त्यांना रोखले. मात्र शिरसाट घडलेल्या प्रकारामुळे चांगलेच नाराज दिसत होते. त्यामुळे कधी काळी एकत्र काम करणाऱ्या नेत्यांमधील नाराजी पाहता राजकारणात काहीही होऊ शकते, असं चित्र सर्वत्र दिसत आहे.
“केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये”; पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षाला घरचा आहेर
यावरून चंद्रकांत खैरै म्हणाले की, मी एक ज्येष्ठ नेता आहे. संजय शिरसाठ यांनी माझ्या हाताखाली काम केलेलं आहे. शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद न मिळाल्याची खदखद शिरसाट यांच्यात आहे. त्यासाठी त्यांची तडफड चालली आहे. त्यांच्या रागाचा त्या ठिकाणी उद्रेक दिसुन आला. मात्र संजय शिरसाट निवडूून यावेत म्हणुन मी सर्वांना फोन केले मग ते निवडूूूून आले. संजय शिरसाट यांचं वागणं हे भाष्कळपणा आहे, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रडीचा डाव सुरू!”; किशोरी पेडणेकर
गणेश उत्सवाच्या अनुशंगाने पोलीस प्रशासनाकडून समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सर्वपक्षीय नेते हे व्यासपिठावर उपस्थित होते. लक्ष वेधले ते शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्या उपस्थितीने कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमाला सुरूवात होताच आयोजकांकडून उपस्थित मान्यवरांच्या सत्कार समारंभाला सुरूवात झाली. पोलिस प्रशासनाकडून चंद्रकांत खैरे यांचा पहिल्यांदा सत्कार करण्यात आला.
पुन्हा मोदीच! जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी अव्वलस्थानी
मात्र हे प्रोटोकॉलनुसार नाही असं म्हणत आमदार संजय शिरसाट हे चांगलेच नाराज झाले. एवढच नाही तर त्यांनी व्यासपीठ सोडून निघाले होते. त्यावेळी शेजारी बसलेल्या एमआयएम पक्षाचे खासदार एम्तियाज जालील यांनी त्यांना रोखले व शांत केले. नंतर त्यांचा सत्कार करण्यात आला पण ते आयोजकांवर चांगलेच नाराज दिसत होते.
Read also
- “तारिख पे तारिख, हे प्रकरण 4 ते 5 वर्ष चालेल, मग आम्हीच निवडणुका जिंकू”; शिंदे गटाचा दावा
- “रोहिणी खडसे आल्या आता पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावे”; राष्ट्रवादीची पंकजा मुंडेंना ऑफर
- “कुठून येत असेल, इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे”? पाक-भारत मॅच दरम्यान शरद पवारांचा जल्लोष
- “झंडू बाम घेऊन ठेवा”; संभाजी ब्रिगेडचा भाजपवर हल्लाबोल
- “हेच अडाणी लोक महाराष्ट्राचे वाटोळे करणार”; रूपाली ठोंबरे-पाटील