मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायलयीन लढाई सुरू आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर तारिख पे तारिख येताना असताना आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या पाच खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी यासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याचा फटका आगामी काळात त्यांना बसू शकतो.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रडीचा डाव सुरू!”; किशोरी पेडणेकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेवर शिंदे गट दावा करीत आहेत. याबाबत हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. यावर रत्नागिरीच्या एका कार्यक्रमात बोलताना भरतशेठ गोगावले बोलताना म्हणाले की, आम्ही मुळेच शिवसैनिक आहोत. 7 तारखेला याबाबतीत निकाल येणार आहे. धनुष्यबाण आमचा आहे. असा दावा देखील त्यांनी केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ते म्हटले की, या लोकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. आता 12 तारिख आली, 22 ता 4 ते 5 वर्ष हे चालेल. दुसरी निवडणुकही 2024 ची आपण जिंकू अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
पुन्हा मोदीच! जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी अव्वलस्थानी
विधानसभेच्या पायऱ्यांवरील राड्यासंदर्भात ते म्हणाले की, परवा काय झालं सांगतो. ओके, पन्नास खोके, ओरडत होते. आम्ही आमच्या स्टाईलनं उत्तर दिलं तेव्हा ते गर्भगळीत झाले. लवासाचे खोके, बारामती ओक्के, अनिल परबांचे खोरे, मातोश्री ओक्के, अशा घोषणा आम्ही दिल्या. आम्ही सांगितलं की आमचा नाद करायचा नाही. आम्हाला पाय लावायचा नाही. त्या मिटकरीला आम्ही पिटकरी करून टाकलं. आता 7 सप्टेंबरला शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण निशाणीची तारिख आहे. यावेळी या सर्वांना कळेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार?; भाजपकडून हलचाली सुरू
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून शिंदे आणि ठाकरे यांच्यातील न्यायालयातील वाद सुरू आहे. शिवसेना नेमकी कुणाची ? याबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. तसेच याचा निकाल वेगळा लागला तर शिंदे गटाला एकतर भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल नाहीतर दुसरा पक्ष स्थापन करावा लागणार. तसेच उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल लागला तर त्यांना नवीन निवडणुक चिन्ह तसेच पक्षाचं नावासाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.
Read also
- “रोहिणी खडसे आल्या आता पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावे”; राष्ट्रवादीची पंकजा मुंडेंना ऑफर
- “कुठून येत असेल, इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे”? पाक-भारत मॅच दरम्यान शरद पवारांचा जल्लोष
- “झंडू बाम घेऊन ठेवा”; संभाजी ब्रिगेडचा भाजपवर हल्लाबोल
- “हेच अडाणी लोक महाराष्ट्राचे वाटोळे करणार”; रूपाली ठोंबरे-पाटील
- “केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये”; पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षाला घरचा आहेर