जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचं एक वक्तव्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावरून त्यांच्यावर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी टिकास्त्र सोडलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिल्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“कुठून येत असेल, इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे”? पाक-भारत मॅच दरम्यान शरद पवारांचा जल्लोष
गुलाबराव पाटील व इतर गद्दार मोठे कर्तृत्व गाजवल्याच्या थाटात भाषण करू नका असा समज विद्या चव्हाण यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे. तसेच स्त्रीरोग तज्ञ बायको नांदत नाही. आपल्या जन्मदात्या आईची आणि बायकोची बहिणीची आठवण असू द्या. असं म्हणत आणि असली तर महिलांचा जाहीर माफी मागा, असं देखील विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता राज्यात आणखी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
“झंडू बाम घेऊन ठेवा”; संभाजी ब्रिगेडचा भाजपवर हल्लाबोल
जळगावाच्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे असतात. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही. डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र आमचं एक डोक व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, आम्ही जनरल फिजिशियन आहोत. असं वादग्रस्त वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे.
“हेच अडाणी लोक महाराष्ट्राचे वाटोळे करणार”; रूपाली ठोंबरे-पाटील
दरम्यान, सध्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर विरोधी पक्ष सातत्याने निशाणा साधत आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेेशना दरम्यान देखील त्यांनी त्यांच्याविरोधात गद्दार गद्दार म्हणून जोरदार घोषणाबाजी दिली होती. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटातील आमदारांनी देखील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिली. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं.
गुलाबराव पाटील व इतर….”गद्दार” मोठे ‘कर्तृत्व’ गाजवल्याच्या थाटात भाषण करू नका…! “स्त्रीरोग तज्ञ” ‘बायको नांदत नाही’…! आपल्या जन्मदात्या ‘आईची’ आणि ‘बायकोची’ ‘बहिणीची’ आठवण असू द्या…! आणि असली तर महिलांची माफी मागा…! pic.twitter.com/QpHzhu0XgL
— Vidya Chavan (@Vidyaspeaks) August 29, 2022
Read also
- “गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होतं, पण त्यांना ते मिळालं नाही”
- “विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही”; नितीन गडकरी
- चंद्रकांत खैरे अन् शिरसाट यांच्यात मान सन्मानावरून वाद; इम्तियाज जलील यांची मध्यस्ती
- “तारिख पे तारिख, हे प्रकरण 4 ते 5 वर्ष चालेल, मग आम्हीच निवडणुका जिंकू”; शिंदे गटाचा दावा
- “रोहिणी खडसे आल्या आता पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावे”; राष्ट्रवादीची पंकजा मुंडेंना ऑफर