मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेच्याविरोधात बंड केला. एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केले. मात्र यानंतर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर सातत्याने टीका केली जात आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे सातत्याने एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत. यावरून आता भाजपकडून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
“झंडू बाम घेऊन ठेवा”; संभाजी ब्रिगेडचा भाजपवर हल्लाबोल
भास्कर जाधव यांचं ठाकरे प्रेम सध्या अधिकच वाहू लागलं आहे. गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होतं, पण त्यांना ते मिळालं नाही. आम्हाला चांगलं माहित आहे, म्हणून जास्त उडू नका, असं ट्विट करत भाजपनेते निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना इशारा देत टोला देखील लगावला आहे.
“हेच अडाणी लोक महाराष्ट्राचे वाटोळे करणार”; रूपाली ठोंबरे-पाटील
सोबतच, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी केली. या युतीवरून भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. यावरून, उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्रमंडळ सोबत सुद्धा युती करतील, असा टोला शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून भाजपनेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
“केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये”; पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षाला घरचा आहेर
सोबतच, शिवसेनेच्या सोबतीला आता संभाजी ब्रिगेड आहे. छत्रपती संभाजींच्या नावानेही दिल्लीच्या बादशाहीचा थरकाप होत असे. ते खरे धर्मवीर होते. त्या धर्मवीराने धर्मरक्षणासाठी, महाराष्ट्रसाठी हौतात्म्य पत्कारले. छत्रपती संभाजीराजांच्या हौतात्म्याच्या ठिणग्यांतून महाराष्ट्रात स्वाभिमान आणि क्रांतीचा वणवा पेटला. महाराष्ट्र लढक राहिला व जिंकला. आता संभाजी ब्रिगेड आणि आम्ही त्याच महाराष्ट्र स्वाभिमानाच्या क्रांतीचा वणवा पेटविण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्हिही जिंकू. नक्कीच जिंकू ! महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा !, असं सामनातुन म्हटलं आहे.
Read also
- “विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही”; नितीन गडकरी
- चंद्रकांत खैरे अन् शिरसाट यांच्यात मान सन्मानावरून वाद; इम्तियाज जलील यांची मध्यस्ती
- “तारिख पे तारिख, हे प्रकरण 4 ते 5 वर्ष चालेल, मग आम्हीच निवडणुका जिंकू”; शिंदे गटाचा दावा
- “रोहिणी खडसे आल्या आता पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावे”; राष्ट्रवादीची पंकजा मुंडेंना ऑफर
- “कुठून येत असेल, इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे”? पाक-भारत मॅच दरम्यान शरद पवारांचा जल्लोष