उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुलायम सिंग यादव हे 80 वर्षांचे असून गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती साथ देत नाही. या आधीही त्यांना मेदांतामध्येच दाखल करण्यात आले होते . त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची ताताडीने कोरोना टेस्टही करण्यात आली. कोरोना टेस्टचा निकालही आला असून टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती हॉस्पिलचे संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिली आहे.