मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमधले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना मुंबई सत्र न्यायालयकडून दोषमुक्त करार करण्यात आले आहे. आजच यासंदर्भातील निकाल न्यायालयाने दिला. त्यांच्यासोबत आणखी ६ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केलं असून, यात पंकज भुजबळ, समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, संजय जोशी, गीता जोशी या सगळ्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी धडपड, महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?
दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणात, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर, विविध कंत्राटाच्याद्वारे लाखो रुपये लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनतर या प्रकरणात सगळ्यात पहिल्यांदा एसीबीने गुन्हा दाखल केला, नंतर ईडीकडून तपास सुरू करण्यात आला. तेव्हा भुजबळांची २०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. तसेच, तपासा दरम्यान त्यांच्या विरोधात सबळ पुरावे आढळून आल्याचं म्हटलं गेलं आणि त्यांना २ वर्षांचा तुरुंगवास झाला होता.
राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांकडून महिला सरपंचाला मारहाण; गौरी गायकवाड देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार
छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना Session's court कडून महाराष्ट्र सदन केस मधून डिस्चार्ज मिळाला आहे. ह्या डिस्चार्ज ला मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 9, 2021
दरम्यान, या प्रकरणात याआधी ५ जणांना दोषमुक्त करार करण्यात आलं आहे. त्यांना क्लीन चिट देताना, न्यायालयाने ACB वर बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवला होता. विकासक चमणकर आणि त्यांच्या कुटुंबियांतील चौघांसह, एका पीडब्ल्यूडी अभियंत्याचा त्यात समावेश होता. त्यानंतर भुजबळ यांनीही, आपलं नाव या गुन्ह्यातून वगळण्यात यावं, अशी याचिका सत्र न्यायलयात दाखल केली होती. त्यानंतर आज न्यायालयाने मोठा निर्णय देत, त्यांना मुक्त केलं आहे.
राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, कोण घेणार सातव यांची जागा?
दुसरीकडे, न्यायालयाच्या या निर्णयांनंतर नाशिक मध्ये भुजबळ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटले असून, उत्सव साजरा केला आहे, तर मुंबई सत्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर माहिती अधिकार याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी या सर्व प्रकरणात आपण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, भाजप सरकार असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे यावर भाजप नेते काय प्रतिक्रया देतात हे पाहावे लागेल.
Read Also :
- किरीट सोमय्या पुण्यात करणार गौप्यस्फोट, दुपारी 3 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद
- पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार
- एकनाथ खडसे सध्या सत्ताधारी गटात असले तरी गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते – ED
- भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
- शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला; कोणत्या मुद्यांवर चर्चां होणार, राजकीय तर्कवितर्कांना उधान