मुंबई : ठाकरे सरकाराच्या मंत्र्यांची पोलखोल करणारे भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या आज पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांची दुपारी ३ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत ते थेट राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत ईडीच्या कारवायांवर केलेल्या भाष्यावर प्रत्युत्तर देणार असून, त्यामुळे यात ते नेमके काय म्हणणार?, कोणावर आरोप करणार?, आणि काय नवे गौप्यस्फोट करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
मोठी बातमी! ठाकरे सरकारची पोलखोल करणाऱ्या सोमैय्यांना आता ‘Z’ दर्जाची सुरक्षा
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केल्यानंतर, वाशिम मधल्या साखर कारखान्यायाला भेट देतेवेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमैय्या यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. यावेळी त्यांच्या वाहनावरही शाही फेकण्यात आली होती. त्यांनतर त्यांच्या सुरक्षेत वाढ केली गेली आहे. दरम्यान, सोमैयांनी प्रताप सरनाईक, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, भावना गवळी व छगन भुजबळ यांच्यास अनेक नेत्यांवर विविध आरोप केलेले आहेत.
I will RESPOND to Shri Sharad Pawar's Observations/Criticism on MP Bhavna Gavli Inquiry
Today 3pm in Press Conference at Patrakar Bhawan Pune
श्री शरद पवारांच्या खा. "भावना गवळी चौकशी वरील निरीक्षण/टीकेला"
मी आज दुपारी 3 वाजता पत्रकार भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत उत्तर देईन
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 9, 2021
दाऊदला पाठवले तरी भीत नाही, मी घोटाळे उघडकीस आणणार – किरीट सोमय्यांनी ललकारले
दुसरीकडे या आरोपानंतर, त्या-त्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमीराही लागला आहे. यावर पवारांनी भाष्य करताना, ‘जिथं गैरव्यवहर होतो, तिथे त्याची तक्रार राज्याच्या गृह खात्याकडे करता येते. तरी ईडी येऊन चौकशी करत असेल, तर ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे, हे चुकीचं आहे. इतक्या वर्षात ईडीच्या कारवाया ऐकल्या नव्हत्या!’ असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचे एकंदरीतच भावना गवळी यांना आणि इतरांना समर्थन आहे का? असा सवाल उपस्थित केला जात होता.
माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली, ते भाईंची मदत घेताहेत – किरीट सोमय्या
दरम्यान, काल सोमैया यांनी, ‘मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत’, असा गंभीर आरोप केला. तसेच, ‘कितीही गुंडांना बोलावले आणि दाऊदला आणले तरी आम्ही घाबरणारे नाही,’ असा इशारा देत, ‘माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत,’ असा गंभीर आरोप केला होता. या सगळ्यानंतर आता त्यांची पत्रकार परिषद होत आहे.
कसा आहे सोमैया यांचा पुणे दौरा
११ वाजता मुळशी (पुणे जिल्हा), ३ वाजता पत्रकार भवन पुणे, ४.१५ तनिष्क शो रूम पुणे, ५ वाजता पुणे जिल्हा बँक, ५.४५ पुणे जिल्हाधिकारी, ६.३० सी ए बैठक राहुल कॉम्प्लेक्स, कृष्णा हॉस्पिटल शेजारी पौड रोड कोथरूड पुणे, ७.३० वाजता मुंबईसाठी रवाना. दरम्यान, सोमय्या यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली असून, त्यांना मोदी सरकारने थेट झेड दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता त्यांच्याभोवती तब्बल सशस्त्र अश्या ४० CISF जवानांच्या सुरक्षेचं कड असणार आहे.
Read Also :
- पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार
- एकनाथ खडसे सध्या सत्ताधारी गटात असले तरी गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते – ED
- भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
- शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला; कोणत्या मुद्यांवर चर्चां होणार, राजकीय तर्कवितर्कांना उधान
- तडस यांच्या कौटुंबिक वादाला नवे वळण, गंभीर आरोपानंतर आता वादावर पडदा पडणार?