नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी, महामारीच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या नियोजनावर आणि व्यवस्थापनावर सातत्याने टीका करताना दिसून येत आहेत. आज देखील त्यांनी केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अश्या सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट्वर टीका केली असून, पंतप्रधान मोदींवर देखील निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारने महामारीच्या काळातच या प्रोजेक्टचा समावेश आवश्यक सेवांमध्ये केला आहे. तसेच, या प्रकल्पाला पर्यावरण संबंधातील सर्व प्रकारची मंजुरी देण्यात देखील आली आहे. दरम्यान, सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा भाग असलेल्या पंतप्रधान निवासस्थानाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल.
यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करत, “सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांचा जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको”, असं म्हणत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Central Vista is criminal wastage.
Put people’s lives at the centre- not your blind arrogance to get a new house!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 7, 2021