कराड: सांगली आणि सातारा जिल्हाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गट, डॉ. इंद्रजित मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्य लढत होणार आहे.दोन्ही मोहितेंचे मनोमिलन आता अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि तीनही पॅनलकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.
रेठरे येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलचा प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे. यावेळी सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांनी अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यावर सडकून टीका केली आहे. दोन्ही मोहितेंचे मनोमिलन करणे हे चुकीचे आहे कारण गेल्या सहा वर्षात दोघांनी एकमेकांवर बरीच चिखल फेक केलेली आहे. जरी देखील हे मनोमिलन झालं तरी देखील ते अभद्र मनोमिलन होणार आणि फक्त आणि फक्त कारखान्यातील पैशांवर डाव मारण्यासाठी होणार असा आरोप सहकार पॅनलच्या डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांवर केला आहे.
कृष्णा सहकारी कारखान्याच्या हितासाठी भविष्यात जे जे चांगलं काम करायचं आहे आणि जे मागील पाच वर्षात आम्ही केलं आहे ते सर्व घेऊन आणि तोच अजेंडा मानून आम्ही सभासदांना सत्तेचे आव्हान करत आहोत. माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी देखील दोन्ही मोहितेंवर टीका केली आहे. निवडणूक होण्याआधीच विरोधकांच्या वाटण्या सुरु झाल्या आहेत. दोन विरोधकांच्यात कारखाना लुबाडला त्यामुळे आता कारखाना चांगला कसा चालवायचा हे सभासदांनी सहकार पॅनलच्या माध्यमातून पहिलेच असेल. कारखान्याच्या सर्वांगीण हितासाठी आणि सभासदांच्या काळजीपोटीच मी सहकार पॅनलमध्ये आहे असे देखील मदनराव मोहिते यांनी स्प्ष्ट केले आहे.