शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना व त्यांच्या 15 वर्षाच्या मुलीला जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांना 20 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती त्यापाठोपाठ त्यांची मुलगी, खाजगी स्वीय सहययक, चुलत भाऊ यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.
दरम्यान जिल्ह्या रुग्णालया मधील सर्व डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी यांनी चागल्या प्रकारे उपचार केले. इतर रूग्णां प्रमाणे आपलीही चांगली काळजी डॉक्टर घेतली असे सांगून जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेबाबत आमदार वैभव नाईक यांनी समाधान व्यक्त केले. आमदार वैभव नाईक लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी यासह सर्वांनी आंनद व्यक्त केला असून जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोना मुक्त होऊदे अशी प्रार्थना केली आहे