केंद्र सरकारच्या पीएम केअर्स फंडातून राज्याला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरमध्ये त्रुटी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्याच्या वाहने खरेदीवरून सरकारवर टीका केली होती. याला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, संपूर्ण गाड्याचा खर्च हा ५० लाख ते १ कोटी पर्यंत असेल मात्र हा काही राज्याचा किंवा देशाचा मुद्दा नाही. मात्र अशा परिस्थितीत देखील भाजपा राजकारण करत असेल तर मागच्या पाच वर्षात त्यांनी काय-काय केले हे सगळ्यांनी बाहेर काढले आहे आणि आम्ही देखील ते बाहेर काढू शकतो.
आधी सदोष चिनी टेस्टिंग किट माघारी पाठवावे लागले तर आता PM Cares फंडातून मिळालेले AgVa व्हेंटिलेटरही अपेक्षेप्रमाणे चालत नाहीत. कोरोनाविरोधात महायुद्ध लढताना वेळ दवडणं आपल्याला परवडणार नाही.त्यामुळं हे व्हेंटिलेटर तातडीने बदलून मिळतील, असा मला विश्वास आहे.@PMOIndia
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 6, 2020
भाजपच्या आमदारांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधीला मदत न करता पीएम केअर्स निधी दिला. केंद्र सरकारने यातून खरेदी केलेले व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रात पाठवले. परंतु ते फॉल्टी आहेत. फडणवीस यांनी याबद्दल केंद्र सरकारला विचारणा करावी, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.