मुंबई : काल सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी चार आठवड्यांसाठी लांबणीवर टाकली. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली गेल्यामुळे आता मराठा समाजाला न्याय देत नोकरभरती प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याबाबत निर्णय घेणार आहेत. नोकरभरती प्रक्रिया थांबवून इतर समाजातील तरुणांवर अन्याय होता कामा नये. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन इतर जागांची भरती करता येईल का, यावर विचार सुरु आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, एवढीच आमची भूमिका असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मराठा आरक्षणाची याचिका पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होईल. यावरुन छत्रपती संभाजीराजे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. सरकारने योग्य नियोजन आणि पूर्वतयारी न केल्यामुळेच मराठा आरक्षणाची सुनावणी लांबवणीवर पडल्याचा आरोप या नेत्यांनी केला.
तामिळनाडूला जमलं ते आपल्याला का जमत नाही ?
राज्य सरकारला तामिळनाडू सरकारप्रमाणे याचिका घटनापीठाकडे जाण्यापूर्वी मराठा आरक्षणावरील स्थगिती का उठवता आली नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तामिळनाडूमध्येही आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. हे प्रकरणही घटनापीठासमोर सुनावणीसाठी आहे. तर केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या 10 टक्के आर्थिक मागास आरक्षणाचे प्रकरणाचीही घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. मात्र, या दोन्ही आरक्षणांवर स्थगिती नसल्यामुळे संबंधितांना त्याच्या सवलती मिळत आहेत. मग महाराष्ट्र सरकारला ही गोष्ट का जमली नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
Read Also
‘पवारसाहेब, हॅट्स ऑफ !’; पंकजा मुंडें यांच्या त्या ट्विटबाबत रोहित पवार म्हणतात…https://t.co/reN5REbQLS#SharadPawar #RohitPawar #PankajaMunde
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 28, 2020