नांदेड : नांदेडमधील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडा चांगलाच तापला असून आरोप-प्रत्यारोपावरून थेट धमकीवर पोहोचला आहे. भाजप नेत्यांपाठोपाठ आता वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही ‘बायको सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा’ असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना धमकीच दिली आहे.
आर्यन खान प्रकरणाचे आणखी १० व्हिडिओ देणार, भाजपचं पितळ उघड पाडणार; संजय राऊतांचा दावा
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती प्रहार केला. ‘आदर्श प्रकरण पुन्हा काढायचे का? अशी धमकीच प्रकाश आंबेडकर यांनी उघडपणे अशोक चव्हाणांना दिला.
तपास यंत्रणा चुकत असतील तर न्यायव्यवस्था त्यांना फोडून काढेल – सुधीर मुनगंटीवार
‘अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल भाजप भरते. अशोकराव, ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. निवडणूक होऊ द्या, आमच्या गाडीमध्ये कुणी-कुणी पेट्रोल भरलं हे राहु द्या, आम्ही हायकोर्टात विचारतो आदर्श प्रकरणात कुणाकुणाचा फ्लॅट आहे. अशोक चव्हाण आपणाला बायको आणि सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा? असा खडासवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण यांना इशारा दिला. तसंच, एक मोर्चा हायकोर्टावर गेला की, तुम्ही दडवलेली फाईल पुन्हा बाहेर येईल आणि सुशीलकुमार शिंदे यांनाही जेलमध्ये घेऊन जाईल, असा इशाराही बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला.
Read Also :
- महापालिका रणधुमाळी २०२२: विद्यमान नगसेवकांना प्रभाग रचनेचा धसका; सोईस्कर प्रभागासाठी रस्सीखेच
- शिवसेनेते असताना मी पक्ष मोठा केला, तेव्हा संजय राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा पटलवार
- एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा; भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
- बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक हवा – चंद्रकांत पाटील
- समीर वानखेडे १०० टक्के मुस्लीमच आहे, हिंदू नाही; मंत्री नवाब मलिकांचा खळबळजनक दावा