मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबीवर झालेल्या गंभीर आरोपानंतर हे प्रकरण आता एका वेगळ्या वळणारवर येऊन ठेपल्याचं पाहायला मिळाला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनीही या प्रकरणात आपण कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार असल्याचं सांगितलंय. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. तसेच तपास यंत्रणा चुकत असतील न्यायव्यवस्था निर्णय घेईल असंही ते म्हणाले.
ड्रग्स प्रकरणात एनसीबीला खोटे ठरवण्यासाठी आता व्हिडीओ क्लिपचा आधार – प्रविण दरेकर
एनसीबीच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या या वादावर बोलताना भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ड्रग्सचा आरोप असलेल्या तरूणाला वाचवण्यासाठी राज्य सरकार सगळी शक्ती पणाला लावतंय असा आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांनी एनसीबीवर केलेल्या आरोपांवर ते म्हणाले की, या राज्यातल्या तरुणांना दीशा देण्याची जबाबदारी आहे, ते या ड्रग्ज प्रकरणातील तरुणाला वाचवताय, आणि केंद्रीय यंत्रणांना दोष देण्याचं काम करताय असंही ते म्हणाले. ड्रग्जमुळे महाराष्ट्र देश बदनाम होतो त्यांचं यांना घेणं देणं नाही, आणि महाराष्ट्र बदनाम होण्याबद्दल बोलताय असंही ते म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांवर झालेल्या आरोपांवर ते म्हणाले की, “जर तपास यंत्रणांनी चुकीचं काम केलं तर न्यायव्यवस्था न्यायाच्या चाबकाने त्यांना फोडून काढेल.” दरम्यान, आज या प्रकरणात एनसीबीवर गंभीर आरोप केलेल्या प्रभाकर साईलने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय गोष्टी समोर येतात हे पाहावं लागणार आहे.
Read Also :
- आर्यन खान प्रकरणाचे आणखी १० व्हिडिओ देणार, भाजपचं पितळ उघड पाडणार; संजय राऊतांचा दावा
- समीर वानखेडेंची होणार उचलबांगडी? सहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल, उद्या दिल्लीत चौकशी होणार
- डोक फिरलेल्या सरकारला देगलूर-बिलोलीच्या निकालातून शॉक द्या – देवेंद्र फडणवीस
- दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 कोटी जमा होणार; विजय वडेट्टीवारांची माहिती
- समीर वानखेडे भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करणार नाही – चंद्रकांत पाटील