नाशिक : शिवसेनेत असताना पक्षासाठी मोठे योगदान दिले, मी शिवसेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदारही नव्हते. ‘मविआ’च्या शिल्पकाराने या सुंदर शिल्पावर ओरखडा देखील उमटणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी बोचरी टीका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिक येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेचे निमित्त होते नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखा घोषित करण्याचे. मात्र, येथे अपेक्षेप्रमाणे राजकारणाचा विषय निघालाच. यावेळी अतिशय संयत आणि सौम्य भाषेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राऊतांच्या कालच्या भाषणाला चोख प्रत्युत्तर दिले.
डोक फिरलेल्या सरकारला देगलूर-बिलोलीच्या निकालातून शॉक द्या – देवेंद्र फडणवीस
संजय राऊत यांनी काल नांदगावचा नाद करायचा नाही, असे वक्तव्य केले होते. यावर भुजबळ म्हणाले, नांदगावबद्दल राऊत काय बोलले हे माहिती नाही. कुठल्या आवाजात ते बोलतात, त्यावरून अर्थ बदलतात. पाहुणचार देवाणघेवाण होत असते. खरे तर संजय राऊत हे शरद पवारांसारखेच ‘मविआ’चे शिल्पकार. सुंदर शिल्प तयार झाले असेल, तर त्यावर ओरखडा उमटणार नाही याची काळजी खास करून शिल्पकाराने घ्यावी. शिवसेनेत मी वेळी राज्यात शाखा सुरू केल्या. त्यावेळी संजय राऊत नव्हते. सामनाच्या लॉचिंग वेळेचेही फोटो माझ्याकडे आहेत, असे म्हणताच चांगलीच खसकस पिकली.
समीर वानखेडेंची होणार उचलबांगडी? सहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल, उद्या दिल्लीत चौकशी होणार
शिवसेनेत मी असतो, तर मुख्यमंत्री झालो असतो, असं म्हणालो हे मान्य. मात्र, कुणालाही पक्षात काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही. संजय राऊत यांनाही काम केल्यानेच सामनाचे संपादक केले. मी जेव्हा शिवसेना मोठी केली, तेव्हा ते खासदार देखील नव्हते. नांदगाव मतदार संघ विसरा असं ते म्हणाले. या बाबत मला पवार साहेबांशी बोलावे लागेल. नांदगावमध्ये मी जे काम केलं, ते त्यांना माहीत नसावं. कारण त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करावं लागतं. त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी या मतदार संघात परत परत यावे. आमचे नेते जयंत पाटील देखील तेथे येऊन गेले. त्यांनीही १०० प्लस आमदार निवडून आणण्याचं आवाहन केलंय, अशी आठवणही भुजबळांनी करून दिली.
Read Also :
- एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा; भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
- बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक हवा – चंद्रकांत पाटील
- समीर वानखेडे १०० टक्के मुस्लीमच आहे, हिंदू नाही; मंत्री नवाब मलिकांचा खळबळजनक दावा
- तपास यंत्रणा चुकत असतील तर न्यायव्यवस्था त्यांना फोडून काढेल – सुधीर मुनगंटीवार
- आर्यन खान प्रकरणाचे आणखी १० व्हिडिओ देणार, भाजपचं पितळ उघड पाडणार; संजय राऊतांचा दावा