पुणे – भाजपा नगरसेवकांना सल्ला देताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. निवडणुकीआधी जनतेला दिलेला शब्द सर्वांनी पाळा, सर्व कामं करा. काही कामं राहात असतात मात्र, ती पुढील निवडणुकीवेळी पूर्ण करायची असतात. नाहीतर शिवसेनेसारखं करु नका., असा टोला लगावत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना सल्ला दिला
निवडणुकीआधी आश्वासन द्यायचं आणि पुन्हा विसरायचं. १०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊ म्हणणाऱ्या शिवसेनेने करोना काळात अवाढव्य वीजबिलं दिली, शिवाय वाहून गेलेल्या घराला अडीच हजारांचं वीजबिल दिलं. अशी शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत, असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेनेनं निवडणुकीआधी १०० युनिटपर्यंत वीजबिल मोफत देऊ, असं अश्वासन दिलं होतं. पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपलं अश्वासन पाळलं नाही. करोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सहा हजार रुपयांचं बील काढले. आमच्या कागलमध्ये तर पुरामध्ये एकाच घर वाहून गेले. त्या कुटुंबाला चक्क अडीच हजारांचं विज बिल आलं. सरकारच्या या कारभारामुळे वाहून गेलेल्या घरात वीज चालू होती का? असा सवाल उपस्थित होतो.