परळी: लोक जेव्हा मला शिव्या देत होते, त्या काळात मला शरद पवार साहेबांनी विरोधीपक्ष नेता हे पद दिले. हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. मी पाहिलेले स्वप्न म्हणजे सिरसाळा येथे सुरू होणारी, एमआयडीसी आहे. आणि या ठिकाणी मी देशातील हवे तेवढे उद्योग येणाऱ्या काळात आणणार आहे. मी मरेल पण तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हे वचन मी आज माझ्या जन्मदिनी आपल्याला देतो. असा विश्वासही या प्रसंगी धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिला.
हे पण वाचा: आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले; राजकारणात कधीही दिखाऊपणा केला नाही – धनंजय मुंडे
दरम्यान वाढदिवसाचं औचित्य साधत घेतलेल्या कार्यक्रमातून, धनंजय मुंडे यांनी यापुढे मनातून राजकारण करणार असल्याचं भूमिका घेतलीय. यामुळं मुंडे भगीणींच्यासाठी झालेल्या राजीनामासत्रा नंतर धनंजय मुंडेंकडून ही भूमिका घेण्यात आल्यानं. राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा, नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच चर्चा रंगू लागलीय
हे पण वाचा: मोठी बातमी: आता मोदी सरकार रेल्वेच्या जमिनी विकणार!
मी राजकारण करत गेलो. अनेक सहकारी सोबत आले, मला नेता म्हणायला लागले. आमच्या राजकारणात प्रामाणिकपणा आहे; म्हणून लोकांनी डोक्यावर घेतले. दिखाऊपणा करु नका, असा संदेश कार्यर्त्यांना बोलताना दिला. अनेक निवडणुका लढलो आणि पडलोपण. पण, भविष्यात प्रत्येक निवडणूक जिंकणार आहे. तुमच्या विश्वासाने कोरोना काळात जिवंत ठेवले. समाजकारणात राजकारण केले नाही, समाजकारणच केले. समय के साथ बदलना होता है! काही जण म्हणाले, मनात राजकारण आणले नव्हते. पण, आता आणणार, हे मी जन्मादिवशी ठरवले आहे. सत्तेतील राजकारणात ज्याचा दोष नाही, त्याला दोष दिला जातो. हे माझ्या बाबतीत घडले आहे, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.
हे पण वाचा: मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल; आमदार अतुल भातखळकरांना आत्मविश्वास
धनंजय मुंडे म्हणाले की, मुलगी वैष्णवी अमेरिकेत आहे, तिकडे जाऊन वाढदिवस साजरा करवा का? असे अनेक प्रश्न होते. अमेरिकेत जर केला तर पंधरा दिवस क्वारंटाइन व्हावे लागगे, त्यापेक्षा आपल्या मायभूमीत कायमस्वरूपी क्वारंटाइन होण्यास तयार आहे. म्हणून इथेच वाढदिवस साजरा केला. स्वतःच्या जन्मावर स्वतःच काय बोलावे, हा प्रश्न आहे. जगात यापेक्षा कोणतेही अवघड काम नाही.