मुंबई : शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाणावर हक्क नेमका कुणाचा? यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोर्टात सध्या दोन्ही बांजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांना विविध संघटनांकडून, राजकीय पक्षांकडून चांगलच बळ मिळत आहे. सध्या अनेक पक्षाचे नेते शिवसेनेत प्रवेश करीत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या शिवसेनेचीच चर्चा सुरू आहे.
राऊतांना दिलासा नाहीच..! दसरा मेळाव्याचं भाषण ही तुरूंगातून पाहणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवबंधन बांधून उमरगा येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक जवळगे, धाराशिव पंचायत समितीचे उपसभापती शाम जाधव नगरसेवक प्रदीप घोणे, गणेश खोचरे, पंकज पडवळ, नाना घाडगे, महेश काटे व सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते, मुंबईचे माजी उपमहापौर, स्व. डॉ. राम. बारोट यांचे चिरंजीव नीरव बारोट यांनी देखील शिवसेनेत आज प्रवेश केला.
“शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागणार?” सुप्रीम कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
त्याचबरोबर काल शिर्डी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख, मोरे माऊली, वारकरी संप्रदाय महाराष्ट्र राज्य प्रसारक व प्रचारक उद्धव कुमठेकर, तसेच श्री श्रेत्र आळंदी येथील वारकरी भक्तांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आळंदी येथे वारकरी भक्तांसाठी रूग्णालय, वारकरी भवन, उभारण्याबाबत शिवसेना पाठपुरावा करून सर्व भक्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे, असं सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपला पाठिंबा उद्धव ठाकरेंना जाहीर केला. यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे, उपस्थित तसेच वारकरी मंडळी देखील उपस्थित होती.
Read also
- मोठा ट्विस्ट..! उद्धव ठाकरेचं 2023 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष, कोर्टात कागदपत्र सादर
- “शिंदेंनी पक्षाची फसवणुक केली, ते सेनेचे प्राथमिक सदस्य सुद्धा नाही”; कोर्टात ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद
- “कितीही अफजल खान आले तरी मी घाबरणार नाही”; ठाकरेंचा शहांवर अप्रत्यक्ष निशाणा
- “मंत्रालयातून संत गाडगेबाबांची” दशसुत्री शिंदे फडणवीस सरकारने हटविली”; राष्ट्रवादीची जहरी टिका
- माझा आई भवानीवर अन् न्यायालयावर विश्वास, लढाई आम्हीच जिंकू..! उद्धव ठाकरे