वाशिम: महाविकास आघाडीत मतभिन्नता असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. दरम्यान, हेच चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दिसून येत आहे. वाशिम जिल्हा परिषदेतील १४ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढणार की स्वबळावर हे अजून ही गुलदस्तातच आहे. तर तिकडे वंचित बहुजन आघाडी व जनविकास आघाडी यांची संयुक्त युतीच्या अधिकृत घोषणा काल (दि.३) करण्यात आली आहे. त्यामुळे वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चौरंगी लढत बघायला मिळणार का याकडे जिल्हावाशियाचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दबातल केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खुल्या प्रवर्गातील जागांसाठी या पोटनिवडणुका होणार आहे. मात्र या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. अद्यापही सर्वच राजकीय पक्षांना या निवडणुका रद्द होतील किंवा केल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे.
मात्र असं असलं तरी निवडणुका झाल्यास तर वाशिम जिल्हात महाविकास आघाडी होणार असे रिसोड-मालेगाव मतदारसंघातील आमदार अमित झनक यांना विचारले असता, आमदार अमित झनक म्हणाले की, याबद्दल अजून काही ठरलेले नाही. परंतू सर्वच पक्ष निवडणूकीला समोरे जाण्यासाठी तयारीला लागले आहेत. पाच तरीख अर्ज भरण्याची शेवटची तारखी आले परंतू आमच्याकडून सर्वच जागेवर अर्ज भरणार आहोत. त्यानंतरच तीन ही पक्ष बसून समोरची रणनिती ठरवतील. जागेवरुन मतभेत झाल्यास काँग्रेसकडून स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी झालेली आहे.
वंचित बहुजन आघाडी व जनविकास आघाडी यांनी काल (दि.३) रोजी वाशिम येथे सोबत निवडणुक लढणारआहोत जाहीर केल. आता राष्ट्रवादी काँग्रेस शिसेनेना सोबत लढणार की स्वबळावर हे बघणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. या तिनही पक्षाच्या नेत्याने अधिकृत महाविकास आघाडी संबंधीत कुठलही अजून घोषणा केली नाही.
विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच!
नाना पटोले म्हणाले की, विधानसभेचा अध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच होणार, त्यावर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस पक्ष आपल्या आमदारांची मतं जाणून घेऊन पक्षश्रेष्ठींना कळवेल आणि अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होईल. आघाडीतील तिन्ही पक्षांचा आपापल्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे संख्याबळ कमी होईल म्हणून व्हिप काढला हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. व्हीप काढणे ही एक व्यवस्था आहे, त्यात वावगे काही नाही.