IMPIMP

खासदार अमोल कोल्हेंनी कोरोनाबाबत संसदेत मांडलेल्या ‘त्या’ बाबी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना देखील सांगायला हव्या होत्या

पुणे : शहरासोबत ग्रामीण भागात देखील कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.शहरात काल (२ ऑक्टोबर) दिवसभरात नव्याने १०२४ रुग्ण संख्या आढळल्याने १ लाख ४७ हजार ३५१ एवढी रुग्ण संख्या झाल्याचे पहायला मिळाले होते.अशा वातावरणामध्ये सर्वसामान्यांना लोकप्रतिनिधींकडून मोठ्या अपेक्षा आहेत.शिरूर लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील कोरोनाच्या मुद्द्यावरून संसदेत केंद्र सरकारने मदत करावी म्हणून आवाज उठवला होता.मात्र कोल्हे आपल्या मतदार संघात फिरकले सुद्धा नसल्याचे अनेक ग्रामीण आणि शहरी स्थानिकांचे म्हणणे आहे.सध्या आळंदी खेड तसेच चाकणमध्ये देखील कोरोनाची परिस्थिती भीषण होत चालली असल्याचे महाराष्ट्र भाजपचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी सांगितले आहे.

याबाबत बोलताना टिळेकर यांनी खासदार अमोल कोल्हेन्नी संसदेत कोरोणा संबंधी ज्या गोष्टी सांगितल्या मग त्या पी पी कीट, कोविड सेंटर संदर्भातील का असेना पण त्यांनी या सर्व गोष्टी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देखील सांगायला हव्या होत्या असं म्हणत खासदार कोल्हेंना टोला लगावला आहे. तसेच सध्या कोरोनाशी लढणारे भाजपचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्याबाबत देखील त्यांनी यावेळी काळजी व्यक्त केली आहे.

सध्या शिरूर,चाकण,खेड आळंदी या भागात कोरोनाची भीषण परिस्थिती आढळुन येत आहे. रुग्नसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही गंभीर बाब असून जुन्नरचे माजी नगराध्यक्ष दिनेश दुभे यांना देखील याच कोरोणामुळे आपले प्राण गमवावे लागले असल्याची खंत देखील यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केली. जुन्नर, खेड, आंबेगाव आणि मंचर येथील नागरिकांसाठी चांगलं कोविड सेंटर आज उभ करण्याची गरज आहे जेणेकरून नागरिकांना उपचारासाठी पुणे शहरात याव लागणार नाही असे स्पष्ट मत यावेळी योगेश टिळेकर यांनी व्यक्त केले.

आज दिवसभरात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १२०९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख २७ हजार ६३९ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कशी आहे परिस्थिती
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात नव्याने ६२३ करोना बाधित रुग्ण आढळले असून २१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १ हजार ४० जण करोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ७९ हजार ३३८ वर पोहचली असून पैकी ६७ हजार ६३ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ३  हजार ७८४ येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.