मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सुरू आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भेटीने फायदाच होईल.
ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री जर देशाच्या पंतप्रधानांच्या भेटीला जात असतील तर त्यामध्ये आम्हाला आनंदच आहे. ही आनंदाची बाब आहे. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भेटीने महाराष्ट्राला फायदाच होईल, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरू केलेल्या आरोपांवरून दरेकरांनी प्रतिउत्तर दिले आहे. इतरांवर आरोप करतांना आपली क्षमता काय आहे, याची अगोदर शहानिशा करावी, आपल्या क्षमतेनुसार आरोप करावे, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ठाकरे-मोदी भेटीवरुन भाजपवर निशाणा साधला. अमोल मिटकरींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
Read Also :
- उद्धव- मोदींची भेट म्हणजे ढकला ढकलीचे राजकारण; विनायक मेटेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
- उद्धव- मोदींच्या भेटीवर चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकणारच
- ठाकरे-मोदी भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल – संजय राऊत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठकीला सुरुवात
- मुंबईच्या मधोमध जंगल फुलणार, ‘आरे’ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द