मुंबई : निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत. तसे तसे पक्ष प्रवेश जोरात सुरू आहे. यातच राज्यात शिवसेना आणि राष्टवादीच्या पक्ष फुटीनंतर अनेकांनी पक्ष त्याग करत दुसऱ्या पक्षात घरोबा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सत्ताधारी पक्षात जाण्याचा कल अधिक असल्याचं सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत आहे. याचाच प्रत्यत काल शिंदे गटात दाखल झालेले राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना ठाकरे, मनसेच्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन याठिकाणी पक्ष प्रवेश सोहळे पार पडले.
हेही वाचा…काँग्रेसच्या जागावाटपाबाबत मोठी बातमी ; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या
ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील माजी नगरसेविका रत्ना महाले यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. महाले यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केलाय. यासह शिवसेनेचे आदिवासी समाज महाराष्ट्र संघटक जगदीश धोडी यांच्या पुढाकाराने पालघर जिल्ह्यातील विविध पक्षांचे सरपंच आणि तसेच पदाधिकाऱ्यांनीही शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्य हाती घेतलं आहे.
हेही वाचा…देशात आणखी एक राजकीय भूकंप, मुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा पक्ष काॅंग्रेसमध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नात
दरम्यान., यासह भिवंडीतील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने राष्ट्रवादीच प्रवेश केलाय. भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेष म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. शिर्डीत राष्ट्रवादीच शिबीर पार पडलं. यावेळी त्यांनी प्रवेश केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
हेही वाचा…“तर गृहमंत्र्यांनी ‘या’ महाशयांवर कठोर कारवाई करा,” रूपाली चाकणकरांची आव्हाडांवर खोचक टिका
हेही वाचा..राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचा संपुर्ण वेळापत्रक, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातून जाणार यात्रा
हेही वाचा…“‘ती’ संधी आता आम्ही सोडणार नाही”, अमोल कोल्हेंचं मोठं विधान
हेही वाचा..धुळ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन ; कार्यकर्ते आक्रमक, जोरदार घोषणाबाजी