धुळे : प्रभू श्रीरामविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपकडून आंदोलने करण्यात आली. तरआव्हाडांना तात्काळ अटक करण्याची मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे. यातच आता अजित पवार गटातील महिला नेत्या रूपाली चाकणकर यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा..“शरद पवार, सुप्रिया सुळेंवर टिका झाली तर आक्रमक व्हा”, एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश
साईबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शिर्डी मधील शिबिरात विचारांची ज्योत पेटवायची सोडून धार्मिक विखारांनी आग लावण्याचे काम जितेंद्र आव्हाडांनी केले. ज्या पवित्र भूमीत सर्व धर्मातील भाविक दर्शनाला येतात. त्या ठिकाणी दळभद्री इतिहास सांगून लोकांच्या भावना भडकवण्याचे काम केले आहे. मागे पोपटपंची करताना हेच महाशय म्हणाले होते “हे वर्ष दंगलींचं वर्ष असेल.” त्या वाक्याला खरं करण्यासाठी तर हा आटापिटा सुरू नाही ना ? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा…“षडयंत्र करून कुणबीच्या नावाने खोटे ओबीसी घुसवणार का ?” मंत्री छगन भुजबळांचा सवाल
पुढे बोलतांना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, महाराष्ट्र शांत आहे, शांतच राहू द्या. लोकांना प्रभू श्रीरामबद्दल प्रेम आहे, त्यामुळे मुद्दाम बोलून लोकांच्या भावना भडकवण्याचे राजकारण बंद करा. उद्या महाराष्ट्रात काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन या महाशयांवर कठोर कारवाई करावी.
साईबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शिर्डी मधील शिबिरात विचारांची ज्योत पेटवायची सोडून धार्मिक विखारांनी आग लावण्याचे काम जितेंद्र आव्हाडांनी केले. ज्या पवित्र भूमीत सर्व धर्मातील भाविक दर्शनाला येतात..1/2@maharashtra_hmo pic.twitter.com/eDigXa3xT0
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 4, 2024
READ ALSO :
हेही वाचा..राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचा संपुर्ण वेळापत्रक, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातून जाणार यात्रा
हेही वाचा…“‘ती’ संधी आता आम्ही सोडणार नाही”, अमोल कोल्हेंचं मोठं विधान
हेही वाचा..धुळ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन ; कार्यकर्ते आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
हेही वाचा…काँग्रेसच्या जागावाटपाबाबत मोठी बातमी ; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…देशात आणखी एक राजकीय भूकंप, मुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा पक्ष काॅंग्रेसमध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नात